भारताने केली अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताने केली अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

ओडीशाच्या तटावर अग्नी प्राईम मिसाईलचं यशस्वी चाचणी करण्यात आलीय. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे मिसाईल २ हजार किलोमीटरपर्यंत मारा करु शकतं. तसच याच प्रकारातल्या इतर मिसाईलच्या तुलनेत अग्नी प्राईम वजनानं हलकं आणि आकारानं छोटं आहे. ह्या नव्या मिसाईलमध्ये अनेक नव्या तांत्रिक बाबींचा समावेश केला गेलाय. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांना ह्या मिसाईलचं यशस्वी परिक्षण केलं गेलं.

गेल्या गुरुवारी ओडिशाच्याच चांदीपूर चाचणी रेंजवर निर्भय मिसाईलची यशस्वी चाचणी केली गेलीय. निर्भय आण्विक हत्यारं घेऊन जाण्यास सक्षम असं क्रुज मिसाईल आहे. निर्भय मिसाईलची लांबी ६ मीटर आहे तर वजन १५०० किलो. याची मारक क्षमता १ हजार किलोमीटरपर्यंत आहे. ह्या मिसाईलची चाचणी १० वाजून ४५ मिनिटांनी केली गेली. निर्भयची तुलना अमेरिकेच्या टॉमहॉक मिसाईलशी केली जाते.

जवळपास ३०० किलोग्राम आण्विक शस्त्रं घेऊन जाण्याची क्षमता निर्भय मिसाईलमध्ये आहे. हे मिसाईल, जमीन, हवा आणि पाण्यातूनही मारा करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे निर्भय मिसाईलला रडारवर शोधणं शत्रूला कठिण जातं. एवढच नाही तर आपल्या लक्ष्यवर मारा करण्यासाठी निर्भयची अचूकता वाखाणण्याजोगी आहे.

हे ही वाचा:

बंगलोसेनेतील अजून एका नेत्याचा अनधिकृत बंगला?

ट्विटरने पुन्हा जम्मू-काश्मीर आणि लडाख भारतापासून वेगळा दाखवला

रेस ट्रॅकवर गाड्या का आणल्या? याचे थक्क करणारे स्पष्टीकरण

ट्विटरच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचाच राजीनामा

यापूर्वी भारताने अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. हे क्षेपणास्त्र पाच हजार किमी. पर्यंत अचूक मारा करू शकते. ज्यामुळे चीनची राजधानी बेजिंग देखील भारतीय क्षेपणास्त्राच्या कक्षेत आली आहे. अशा पद्धतीची लांब पाल्याची क्षेपणास्त्र असलेला भारत हा जगातील काही मोजक्याच देशांपैकी एक आहे.

Exit mobile version