पहिल्या टी-२० सामन्यात पराभव झाल्यानंतर इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यातील दुसरा टी-२० सामना पुन्हा एकदा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला. या सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय प्राप्त केला
आज यजमान संघाने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. नियमित करून भारतीय संघाने इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर भूवनेश्वर कुमारने जेसन रॉयला पायचित केले. त्यानंतर सातत्याने विकेट्स पडल्यामुळे पहिल्या डावाअखेरीस धावफलकावर ६ विकेट्सच्या बदल्यात १६४ धावा इंग्लंडचा संघ लावू शकला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जेसन रॉय (४६)याने सर्वोत्तम फलंदाजी केली. तर भारताच्या वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
हे ही वाचा:
सचिन वाझे यांना पंचवीस मार्च पर्यंत एनआयए कोठडी
उर्दू भवनासाठी शिवसेनेचा पुढाकार
सचिन वाझे यांच्यासोबत आणखी काही अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता?
आज भारताकडून इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरूवात केली. इंग्लंडच्या १६५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा प्रथमच गोलंदाजी करायला उतरलेला गोलंदाज सॅम करन याने के एल राहुलला शुन्यावर बाद केले. त्यानंतर दुसऱ्या बाजूने इशानने इग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घ्यायला सुरूवात केली. कप्तान विराट कोहली याच्या साथीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने ३२ चेंडूत ५६ धावा केल्या. त्यानंतर पंत देखील २६ धावा करून बाद झाल्यावर श्रेयस अय्यरच्या साथीने कोहलीने भारताला विजयापर्यंत पोहोचवले. त्याने ४९ चेंडूंत नाबाद ७३ धावा केल्या. जिंकण्यासाठी पाच धावांची आवश्यकता असताना खणखणीत षट्कार खेचून कोहलीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.