Asia Cup 2022: श्रीलंकेकडून पराभव आता भारतासाठी ‘आशा’ कप

दुबईत सध्या आशिया चषक २०२२ स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे.

Asia Cup 2022: श्रीलंकेकडून पराभव आता भारतासाठी ‘आशा’ कप

दुबईत सध्या आशिया चषक २०२२ स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. मंगळवार, ६ सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये सुपर- ४ टप्प्यातला सामना पार पडला. काल झालेल्या चुरशीच्या लढतीत श्रीलंकेकडून सहा गडी राखून पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेने मात्र अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

श्रीलंकन गोलंदाज दिलशान मदुशंका, सी. करुणारत्ने, दसून शनाका यांनी केलेल्या टिचून गोलंदाजी समोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. नाणेफेक जिंकत श्रीलंकेने भारतीय संघाला फलंदाजी करण्यास भाग पाडलं. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. राहुल आणि विराट दोघंही स्वस्तात तंबूत परतल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला. रोहितने ४१ चेंडूंत ७२ धावा करताना ५ चौकार आणि ४ षटकार लगावले. त्यानंतर मात्र भारताचे फलंदाज काही अंतराने माघारी जात राहिले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ बाद १७३ धावा केल्या.

श्रीलंकेचे फलंदाज १७४ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरले. पथुम निसंका आणि कुशल मेंडिस यांनी श्रीलंकेला भक्कम सुरुवात करून दिली. त्यांच्या अर्धशतकी खेळी श्रीलंकेसाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहल याने दोन फलंदाजांना तंबूत धाडून भारतीय संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, अखेरच्या पाच षटकांत कर्णधार दसून शनाका आणि भानुका राजपक्षे यांनी ३४ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी करून श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

भारत: २० षटकांत ८ बाद १७३ (रोहित शर्मा ७२, सूर्यकुमार यादव ३४; दिलशान मदुशंका ३/२४) पराभूत वि. श्रीलंका: १९.५ षटकांत ४ बाद १७४ (पथुम शनाका ५२, कुशल मेंडिस ५७, दसुन शनाका नाबाद ३३, राजपक्षा नाबाद २५, युझवेंद्र चहल ३/३४)

भारताचं अंतिम फेरीत धडकण्याचं गणित

Exit mobile version