भारत इराणच्या पाठीशी, राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त!

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याकडूनही शोक व्यक्त

भारत इराणच्या पाठीशी, राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त!

हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेल्या इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूच्या बातमीने धक्का बसला आहे.भारत इराणच्या पाठीशी उभा असल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विटकरत शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसला आहे.भारत-इराणचे संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम लक्षात राहील. त्यांचे कुटुंब आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या सहवेदना आहेत.कठीण प्रसंगी भारत इराण सोबत पाठीशी आहे, असं पंतप्रधान यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार; तारीख ठरली

उपचारांसाठी भारतात आलेले बांगलादेशचे खासदार बेपत्ता

ईडी-सीबीआय बंद झाले पाहिजेत!

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरांतून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डर जप्त!

 

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी देखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.ते म्हणाले की, हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष डॉ. इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री एच. अमीर-अब्दुल्लाहियान यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांना खूप धक्का बसला आहे. जानेवारी २०२४ मधील आमची शेवटची भेट यासह त्यांच्यासोबतच्या अनेक बैठका मला आठवतात. त्यांच्या कुटुंबीयांना आमच्या संवेदना. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही इराणच्या लोकांसोबत उभे आहोत, असे मंत्री जयशंकर यांनी म्हटलं.

अजरबैजानवरुन परतताना इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. खराब हवामानामुळे इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री हुसैन अमीराब्दुल्लाहियन, पूर्व अज़रबैजानचे अयातुल्ला अल-हाशेम आणि पूर्व अजरबैजान प्रांताचे गवर्नर मालेक रहमतीसोबत त्यांचे अंगरक्षक सुद्धा होते.या दुर्घटनेत सर्व व्यक्तींचा मृत्यू झाला.

Exit mobile version