भारत आणि श्रीलंका यांच्या सध्या कसोटी मालिका सुरु असून या मालिकेतील दुसरी कसोटी आजपासून सुरु होणार आहे. डे अँड नाईट स्वरूपाचा हा सामना असणार आहे. त्यामुळे गुलाबी चेंडूनी हा सामना खेळला जाईल. बंगलोर येथे हा सामना खेळला जात असून. दुपारी दोन वाजता चिन्नास्वामी मैदानावर या सामन्याला सुरुवात होईल.
दुसरा कसोटी सामना जिंकत या मालिकेत श्रीलंकन संघाला व्हाईट वॉश देण्याचे लक्ष भारतीय संघासमोर असणार आहे. भारतीय संघाने पहिला कसोटी सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवला. एक डाव राखत भारतीय संघाने श्रीलंकेला धूळ चारली. त्यामुळे या पराभवातून सावरण्यासाठी श्रीलंकेचा प्रयत्न असेल. तर या सोबतच श्रीलंकेचा संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. त्यामुळे हे मालिका २-० अशी जिंकून या मालिकेची विजयी सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
हे ही वाचा:
आईची भेट, आशीर्वाद आणि खिचडीचा आस्वाद
सपाच्या मतांची संख्या वाढली पण भाजपा सरसच!
राजधानी दिल्लीत अग्नितांडव; सात जणांचा मृत्यू
चुकून सुटलेले भारतीय क्षेपणास्त्र थेट घुसले पाकिस्तानमध्ये
या सामन्यात भारतीय संघ कोणत्या नव्या खेळाडूंना संधी देणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. फिरकीपटू अक्सर पटेल याला दुसऱ्या कसोटीसाठी संघात जागा मिळाली आहे. त्यामुळे अंतिम ११ मध्ये त्याला स्थान मिळण्याची शक्यता आहे. हा सामना कर्णधार रोहित शर्माचा ४०० वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.