जाडेजा, केएल राहुल भारतीय संघात परतले

इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीरन्यांसाठी भारतीय संघ जाहीर

जाडेजा, केएल राहुल भारतीय संघात परतले

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. आतापर्यंत दोन सामने खेळून झाले असून यात दोन्ही संघ एक एक विजयासह बरोबरीत आहे. यानंतर भारतीय नियामक क्रिकेट मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

यावेळी नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. तर, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा संघात परतले आहेत. केएल राहुल आणि रवींद्र जाडेजाच दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकले नव्हते. मोहम्मद सिराज याला विश्रांती देण्यात आली होती. त्याचेही पुनरागमन झाले आहे. याशिवाय विराट कोहली मात्र, वैयक्तिक कारणामुळे पुढील तीनही सामने खेळणार नाही. फलंदाज श्रेयस अय्यरही संघाच्या बाहेर आहे.

रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल यांनी दोघांनी फिटनेस टेस्ट पास केली तरच त्यांचा संघात समावेश होईल हे बीसीसीआयने स्पष्ट केल आहे. सीनियर सिलेक्शन कमिटीची शुक्रवार, ९ फेब्रुवारीला एक बैठक झाली. त्यात संघावर चर्चा झाली आणि रविवारी १० फेब्रुवारीला बोर्डाने संघाची घोषणा केली.

संघात फार मोठे बदल करण्यात आले नसून आकाश दीप या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीपला टेस्ट संघात स्थान मिळाला आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर बाहेर गेल्याने सरफराज खान आणि रजत पाटीदार यांना संघात आपलं स्थान टिकवण शक्य झाले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारी रोजी राजकोट येथे सुरू होईल, तर चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारी रोजी रांची येथे सुरू होईल. मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी ७ मार्च पासून धरमशाला येथे खेळली जाईल.

हे ही वाचा:

सलमान खुर्शीद यांच्या पत्नीसमोरील अडचणींत वाढ

गाझा युद्धात इस्रायलचे पुढील लक्ष्य रफा

दिल्लीत अतिक्रमणविरोधी मोहिमेत मशिद, मंदिरे आणि दफनभूमीवर बुलडोझर

हल्दवानी घटनेनंतर ५००० जणांविरुद्ध गुन्हा

भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

Exit mobile version