भर बर्फात बॉलीवूड गाण्यावर सैन्याचे कदमताल

भर बर्फात बॉलीवूड गाण्यावर सैन्याचे कदमताल

जमिनीवर सर्वत्र पसरलेली बर्फ़ाची चादर. शरीराला गोठवणारी थंडी. कधी खराब हवामान तर कधी बर्फ़ाचे वादळ. अशा सर्व परिस्थितीत तहान भूक हरपून देशसेवेसाठी, आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी सदैव तत्पर आणि जागरूक असलेले भारतीय जवान हे कायमच आपल्या देशासाठी कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय असतात. भारतीय सैन्याची शिस्त, त्यांची कडक अशी देहबोली आणि त्या शिस्तीने केला जाणारा थक्क करणारा असा कदमताल, संचलन हे कायमच आकर्षणाचे बिंदू असतात.

भारतीय सैन्याच्या अशाच एका ताज्या संचलनाच्या व्हिडिओने सर्वांची मने जिंकली आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्यातील जवानांचे पथक हे भर बर्फात संचलन करताना दिसत आहेत. अंगावर थंडीचे कपडे, पायात जाड बूट अशा सर्व गणवेशासह हे भारतीय जवान संचालन करताना दिसत आहेत आणि ते देखील हिंदी चित्रपटातील एका गाण्यावर!

हे ही वाचा:

विवो आयपीएल आता टाटा आयपीएल

कुस्तीगीराच्या हत्येआधी सुशीलकुमारने स्टेडियममध्ये कुत्र्यांवर गोळ्या झाडल्या होत्या…

कर्ज द्यायला नकार, पेटवून दिली बँक

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

१९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या हमजोली या हिंदी चित्रपटातील ‘ढल गया दिन, हो गयी शाम’ या प्रसिद्ध गाण्यावर हे जवान आपला कदमताल करताना दिसत आहेत. अभिनेता जितेंद्र आणि अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्यावर हे गाणे चित्रित झाले आहे. या गाण्याच्या तालावर जवानांचे संचलन सुरु होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Exit mobile version