‘बांगलादेशात हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करा’

चिन्मय प्रभूच्या अटकेवरून भारताने बांगलादेशला खडसावले

‘बांगलादेशात हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करा’

बांगलादेशातील हिंदू समाजाचे नेते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांच्या अटकेचा भारताने निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर चिंता व्यक्त केली. बांगलादेशातील अतिरेकी घटकांकडून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर झालेल्या अनेक हल्ल्यांनंतर ही घटना घडली असल्याचे भारताने म्हटले आहेत. तसेच या घटनांचे गुन्हेगार अद्याप फरार असून हे दुर्दैव असल्याचे म्हटले आहे.

बांगलादेशस्थित सनातन जागरण जोटचे प्रवक्ते आणि इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्ण दास यांना अटक आणि जामीन नाकारल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, बांगलादेशातील अतिरेकी घटकांकडून हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेनंतर ही घटना घडली आहे, ज्यात जाळपोळ, लूटमार, चोरी, तोडफोड आणि धार्मिक स्थळांची विटंबना यासारख्या घटनांचा समावेश आहे.

या घटनांचे गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत, अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी. मात्र, जे धार्मिक नेते शांततापूर्ण सभांद्वारे त्यांच्या मागण्या मांडत आहेत अशा लोकांवर कारवाई केली जात आहेत, हे दुर्दैवी आहे. आम्ही बांगलादेशच्या अधिकाऱ्यांना हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या शांततापूर्ण संमेलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारासह सुरक्षितता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन करतो, असे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा : 

आम्ही कायद्याची छाननी करण्यासाठी, विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही!

संभल हिंसाचार; शाळा-दुकाने उघडली, पण इंटरनेट सेवा बंद!

इस्लामाबाद बनले रेड झोन, आंदोलकांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश!

लग्नाचे विधी सोडून नवरदेव धावला ‘चोराच्या’ मागे

Exit mobile version