भारत आणि मालदीव या दोन्ही राष्ट्रांमधील तणाव निवळला नसताना भारताकडून मालदीवला आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे. भारताकडून मालदीवला साखर, गहू, तांदूळ आणि बटाट्यासारख्या वस्तूंची निर्यात केली जाणार आहे. विदेशी व्यापार महासंचालनालयाने याबाबत अधिसूचना जाहीर करून ही माहिती दिली.
दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार करारांतर्गत या वस्तूंची निर्यात केली जाईल. यात सन २०२४-२५मध्ये मालदीवला साखर, गहू, तांदूळ आणि कांदा यांसारख्या आवश्यक वस्तूंच्या मर्यादित निर्यातीवर कोणत्याही सद्यस्थितीतील किंवा भविष्यातील निर्बंधातून सवलत दिली जाईल.
हे ही वाचा..
प. बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला
फलंदाजांच्या शरणागतीमुळे चेन्नईचा पराभव
१९८१मध्ये झालेल्या द्विपक्षीय व्यापारांतर्गत निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंची स्वीकृत मात्रा यंदा सर्वांत अधिक आहे. ज्या वस्तूंची भारत मालदीवला निर्यात करेल, त्यात तांदुळ (एक लाख २४ हजार २१८ टन), गहू (एक लाख नऊ हजार १६२ टन), कांदा (३५ हजार ७४९ टन), दगड आणि रेती (१० लाख टन) आणि ४२ कोटी ७५ हजार अड्यांचा समावेश आहे.
मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मानले आभार
मालदीवचे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांनी भारत सरकारचे आभारम नले आहेत. मालदीवला वर्ष २०२४ आणि २०२४ दरम्यान भारताकडून आवश्यक वस्तूंची आयात करून देशाला सक्षम करण्यासाठी कोट्याचे नूतनीकरण केल्याने परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर आणि भारत सरकारचे आभार मानतो. भारताचे हे पाऊल दीर्घकालीन मित्रत्वाचे द्योतक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.