आज की बार, १०० करोड पार

आज की बार, १०० करोड पार

आज भारत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आत्तापर्यंत भारताने तब्बल ९९ कोटी ९३ लाखांपेक्षा अधिक लसी देऊन झाल्या आहेत. त्यामुळे आज भारत १०० कोटी लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणार आहे. अशी विक्रमी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. भारताच्या या कामगिरीमुळे कोरोना विरोधातील लढाईला अधिक बळ आणि प्रोत्साहन मिळणार आहे.

भारतात सध्या जगातील सर्वात मोठी कोविड विरोधातील लसीकरण मोहीम सुरु आहे. १९ जानेवारी रोजी भारतात या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. तर आज भारत १०० कोटी लसीकरण पूर्ण करण्याच्या टप्प्यावर आहे. अवघ्या ९ महिन्यांच्या कालावधीत भारत हा विक्रमी टप्पा पार करत आहे. या आधीही भारताने या लसीकरण मोहिमेत अनेक वेगवेगळे विक्रम रचले आहेत. १७ सप्टेंबर रोजी भारताने एका दिवसात तब्बल अडीच कोटी लसींच्या मात्रा देण्याचा विक्रम रचला होता.

हे ही वाचा:

जरंडेश्वर प्रकरणी सोमैय्यांची ईडीकडे तक्रार

मुंबईच्या फुटपाथवरून जप्त केले २१ कोटीचे हेरॉईन आणि महिलेला केले जेरबंद

ठाकरे सरकार हेच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी

निकाह हा एक करार आहे, हिंदू विवाहासारखा संस्कार नाही!

भारतातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास ७४% किंवा जवळजवळ तीन-चतुर्थांश लोकांना किमान एक डोस मिळाला आहे. तर ३०% लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. लहान लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये कोविड -१९ लसीकरणाचे प्रमाण हे उल्लेखनीय आहे. सिक्कीम, हिमाचल प्रदेश, गोवा आणि जम्मू -काश्मीर, लडाख, चंदीगड आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीला आधीच लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. दोन्ही डोस घेतलेले आरोग्य सेवक ८७ ,८३,६६५ इतके आहेत. तर लक्षद्वीप, सिक्कीम आणि लडाखच्या बाबतीत प्रत्येकी ४०% पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.

Exit mobile version