७५ किमीचा रस्ता पाच दिवसात बांधून भारताने रचला विक्रम

७५ किमीचा रस्ता पाच दिवसात बांधून भारताने रचला विक्रम

महाराष्ट्रातील एका रस्त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. अमरावती ते अकोला या ७५ किलोमीटरच्या रस्त्याचं काम विक्रमी वेळेत केल्याप्रकरणी याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम झाला आहे.

अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे विक्रमी बांधकाम ३ जूनपासून सुरू झाले होते. हे बांधकाम मंगळवार, ७ जून रोजी पूर्ण झाले. हा ७५ किमीचा रस्ता पाच दिवसांत बांधून पूर्ण झाला. त्यानंतर या कामाची नोंद गिनीज बुकमध्ये देखील झाली. राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असून महामार्गावरील लोणी ते बोरगावमंजू या ७५ किमी रस्त्याचे बांधकाम बिटूमिनस काँक्रीट पद्धतीने झाले. यासाठी ७२८ मनुष्यबळ वापरलं गेलं.

हे ही वाचा:

नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स आखाती देशांवर बरसले; ते टीकेच्याच लायक आहेत…

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन केंद्राचीच!

आता रेल्वेत महिन्याला होणार २४ तिकिटांचे बुकिंग

पंतप्रधान मोदींनी केली नवीन नाणी लाँच

हा विक्रम रचल्यानंतर ‘गिनीज बुक रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. “हा एक ऐतिहासिक क्षण असून राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि जगदीश कदम यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन. ७५ किमी अखंड बिटुमिनस काँक्रीट रस्ता टाकण्याचे काम पूर्ण केलं. सर्व इंजिनिअर आणि कामगारांचे आभार. संपूर्ण देशाला अभिमान आहे,” अशा शब्दात नितीन गडकरींनी कौतुक केलं आहे.

Exit mobile version