भारताची युद्धग्रस्त लेबनॉनला वैद्यकीय साहित्याची मदत, ११ टनाची पहिली खेप रवाना!

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली माहिती

भारताची युद्धग्रस्त लेबनॉनला वैद्यकीय साहित्याची मदत, ११ टनाची पहिली खेप रवाना!

भारताने युद्धग्रस्त लेबनॉनला वैद्यकीय साहित्य पाठवले आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर लेबनॉन पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे लेबनॉन मोठ्या संकटात सापडला आहे. येथील बहुतांश नागरिक देश सोडून इतर देशात जात आहेत. याच दरम्यान, भारताने मदतीचा हात पुढे करत लेबनॉनला वैद्यकीय साहित्य पाठवले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज (१८ ऑक्टोबर) ट्वीटकरत याची माहिती दिली.

रणधीर जयस्वाल यांनी ट्विटकरत पोस्टमध्ये म्हटले की, ‘भारताने लेबनॉनला मानवतावादी मदत पाठवली आहे. एकूण ३३ टन वैद्यकीय साहित्य पाठवले जात आहे. यामध्ये ११ टन वैद्यकीय साहित्याची पहिली खेप आज पाठवण्यात आली आहे. या खेपमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी औषधे, NSAIDs (नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स), अँटी-इंफ्लेमेटरी एजंट्स, अँटीबायोटिक्स आणि ऍनेस्थेटिक्ससह विविध फार्मास्युटिकल उत्पादनांचा समावेश आहे.

हे ही वाचा : 

फतवा निघाला, हिंदू संताची बाजू घेणाऱ्या शिंदे-फडणवीसांना पराभूत करा…

महाविकास आघाडीत बिघाडी; जागा वाटपाचा वाद चव्हाट्यावर

जेएनयुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार

२४ कॅरेटची लक्षणे…

दरम्यान, इस्रायल-हमास युद्ध सुरूच आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासचा म्होरक्या याह्या सिनवार हा ठार झाला आहे. हमासने याह्या सिनवारच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. जोपर्यंत गाझामधील आक्रमण थांबत नाही आणि इस्त्रायली सैन्याने या भागातून माघार घेत नाही तोपर्यंत इस्रायली ओलीसांची सुटका केली जाणार नाही, असा इशाराही हमासने इस्रायलला दिला आहे.

Exit mobile version