नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी

नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी

भारताच्या दृष्टीने एक महत्वाची घटना घडल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर महिन्यात बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची चाचणी केल्याचे समोर आले आहे. भारतासाने चाचणी केलेली ही तिसरी बॅलेस्टिक मिसाईल आहे. युकेमधल्या जेन्स डिफेन्स विकली या संरक्षण विषयक साप्ताहिकाने याविषयीचा अहवाल प्रकाशित केला आहे, या अहवालात प्लॅनेट लॅबच्या काही ताज्या सेटलाईट फोटोंचा हवाला देण्यात आला आहे.

एस ४ असे या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनमचे नाव असल्याचे समजते . तर ही सबमरीन भारताच्या आयएनएस अरिहंत आणि अरिघात यांच्या पेक्षा आकाराने थोडी मोठी असल्याचीही माहिती मिळत आहे. गेल्या महिन्यात २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथील सबमरीन बिल्डींग सेंटर येथून एस ४ सबमरीनचे लॉन्चिंग करण्यात आल्याचे जेन्स या साप्ताहिकाच्या अहवाल म्हटले आहे.

हे ही वाचा:

कंगना रानौतला न्यायालयाचा धक्का!

समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?

५० रुपये चोरले म्हणून वडिलांनी केली मुलाची हत्या

खणखणीत नाणे, नारायण राणे

या सबमरीनला अण्वस्त्रांसाठी 8 ट्यूब असल्याची माहिती मिळत आहे. के 4 प्रकारच्या बॅलेस्टिक मिसाईल या सबमरीनमधून लाँन्च करणे शक्य होणार आहे. या मिसाईलची क्षमता साडेतीन हजार किलोमीटर अंतरावरचे लक्ष भेदण्याची आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही सबमरीन दाखल झाल्याने आपली शस्त्रसज्जता कैक पटीने वाढणार आहे.

Exit mobile version