भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. मोहाली येथे हा सामना सुरु झाला असून पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या दिवसाअखेर भारताने धावफलकावर ३५७ धावा केल्या आहेत. तर त्या बदल्यात भारतीय संघाचे ६ खेळाडू तंबूत परतले आहेत.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल हे भारतातर्फे सलामीसाठी मैदानात उतरले. या दोघांनीही संघाला चांगली सुरवात करून दिली. पण अर्धशतकी भागीदारी करून दोघेही माघारी परतले. त्यानंतर हनुमा विहारी आणि विराट कोहलीने संघाचा डाव सावरायचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
‘एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण अशक्य’
सर्व कामकाज बाजूला ठेवून ओबीसी आरक्षणावर चर्चा करा
अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन
विहारीने अर्धशतक साजरे केले, तर कोहलीने ४५ धावा केल्या. विराट कोहलीचा हा १०० वा कसोटी सामना होता. त्यामुळे त्याच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. विराट कोहलीच्या या खास कसोटीत तो शतक साजरे करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण चाहत्यांची निराशा झाली. पण त्यानंतर रिषभ पंतने तुफान फटकेबाजी करत भारतीय धावफलक पळवला.
त्याने ९७ चेंडूत ९६ काढावा करून तो बाद झाला. सध्या रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन भारताकडून खेळात आहेत. जडेजा ४५ धावांवर नाबाद आहे. तर रविचंद्रन अश्विन दहा धावांवर खेळात आहे.