दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा कायम

दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा कायम

ऑस्ट्रेलियात विजयी कामगिरी केलेल्या भारतीय क्रिकेट संघाने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पहिल्या कसोटी सामान्यात ब्रिटीश संघाकाडून हार पत्करल्यानंतर जोरदार कमबॅक केले आहे. कालपासून नाणेफेक जिंकल्यानंतर सबंध दिवस भारताने फलंदाजी केली. रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने ३२९ धावांचे लक्ष्य उभे केले.

यामध्ये रोहित शर्माच्या दमदार १६१ धावांसोबतच अजिंक्य रहाणेच्या ६७ धावांचे सुद्धा योगदान होते. पहिला दिवस समाप्त होताना रिषभ पंत ३३ नाबाद होता. अक्षर पटेल आणि रिषभ पंत यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात केली. अक्षर पटेल आणि इशांत शर्मा हे स्वस्तात बाद झाल्यानंतर रिषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांवर जोरदार प्रहार करणे चालू ठेवले. भारताचा डाव समाप्त होताना रिषभ पंत ५८ वर नाबाद राहिला. पहिल्या डावाच्या अखेरी भारताने ३२९ धावा केल्या होत्या.

त्यांनतर इंग्लंड फलंदाजीसाठी उतरले. दुसऱ्या डावात ३३० धावांचा पाठलाग करायला इंग्लंडतर्फे रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली हे पहिले फलंदाज मैदानात उतरले. मात्र डावाच्या तिसऱ्या चेंडूतच शुन्य धावांवर इशांत शर्माने बर्न्सचा अडथळा दूर केला. मैदानावरील पंचांनी एलबीडब्ल्युसाठी बाद दिल्यानंतर बर्न्सने बचावासाठी डीआरएसचा वापरही करून पाहिला, मात्र निर्णय भारताच्याच बाजूने राहिला. मागील सामन्यात दमदार कामगिरी करणारा जो रूट देखील केवळ सहा धावा करून स्वस्तात बाद झाला. पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत इंग्लंडचे ४ खेळाडू बाद झाले होते. त्यानंतर इग्लंडच्या ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या. ऑली पोप आणि बेन फोक्स यांनी काही काळ लढत द्यायचा प्रयत्न केला मात्र मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पोपला देखील बाद केले. त्यामुळे इंग्लंडचा संपूर्ण संघ १३४ धावांवर बाद झाला.

आजच्या दिवसाचा खेळ समाप्त होता भारताने दुसऱ्या डावासाठी फलंदाजी करायला सुरूवात केली आहे. शुभमन गिल १४ धावा करून बाद झाला. रोहित शर्मा २५ धावांवर नाबाद आहे, तर चेतेश्वर पुजारा ७ धावांवर खेळत आहे.

Exit mobile version