भारताचा इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय

४३४ धावांनी जिंकला सामना

भारताचा इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने मोठा विजय मिळविला. चौथ्या दिवशी भारताने डाव घोषित करून ५५७ धावांचे लक्ष्य इंग्लंडपुढे ठेवले होते, पण इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १२२ धावांत आटोपला आणि भारताने या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.  इंग्लंडचे फलंदाज तर २० पेक्षा अधिक वैयक्तिक धावाही करू शकले नाहीत. भारताने हा सामना तब्बल ४३४ धावांनी जिंकला.

पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत भारताने मिळविलेला हा विजय सर्वात मोठा विजय आहे. याआधी, २०२१मध्ये भारताने न्यूझीलंडवर ३७२ धावांनी विजय मिळविला होता. २०१५मध्ये भारताने ३३७ धावांनी विजय मिळविला होता तर २०१६मध्ये न्यूझीलंडवर भारताने ३२१ धावांनी विजय मिळविला तर २००८मध्ये ऑस्ट्रेलियावर ३२० धावांनी मोठी विजय मिळविला होता.

हे ही वाचा:

काका पुतण्याचे संबंध कसे असावेत? रितेश देशमुखांनी सांगितली आठवण

संदेशखाली हिंसाचार:टीएमसी नेते शिबू हाजरांना ८ दिवसांची पोलिस कोठडी!

कमलनाथ यांना काँग्रेसने नाकारले राज्यसभेचे तिकीट, म्हणून…

हाताला सूज आली, मग शरीर सुजले…’दंगल’फेम सुहानीच्या निधनाचे कारण आले समोर

इंग्लंडसाठी हा दुसऱ्या क्रमांकाचा पराभव आहे. १९३४ मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवपर ५६२ धावांनी विजय मिळविला होता. तिसरा मोठा पराभव वेस्ट इंडिजविरोधात इंग्लंडला मिळाला होता. ४२५ धावांनी इंग्लंडला हार पत्करावी लागली होती.

या दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ केवळ १२२ धावांपर्यंत मजल मारू शकला. यात रवींद्र जाडेजाने पाच विकेट्स मिळविल्या तर कुलदीप यादवला दोन बळी मिळविता आले. बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी एक बळी मिळाला.

Exit mobile version