देशभरात आढळले अडीच लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण

देशभरात आढळले अडीच लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण

अंटार्टिकामध्ये सुद्धा कोरोनाची लागण. चिलेच्या संशोधन केंद्रातील ३६ शास्त्रज्ञांना बाधा.

रविवारी देशभरात कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गेल्या २४ तासांत देशात झालेली रुग्णवाढ बघता हा आकडा अडीच लाखांच्या पार गेला आहे. १८ एप्रिल रोजी देशात २,५७,३०७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर १३८४ कोरोना रुग्नांचे मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. या कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत सर्वाधिक रुग्णवाढ ही महाराष्ट्रात झाली आहे. तर मृत्यूंच्या बाबतीतही सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत.

रविवारी महाराष्ट्रात रुग्णवाढीच्या बाबतीत ६८,००० चा टप्पा पार केला गेला. मागील २४ तासांत राज्यात ६८,६३१ नवे रुग्ण आढळून आले तर ५०३ लोकांनी कोरोनामुळे आपले जीव गमावले आहेत. रविवारी महारष्ट्रासोबतच उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्येही झालेली रुग्णवाढ ही चिंताजनक आहे. उत्तर प्रदेशात ३०५६६ नवे कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले. तर राजधानी दिल्लीत आढळलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा हा २५,४६२ हा आहे. महाराष्ट्र राज्याच्या पाठोपाठ सर्वाधिक मृत्यूही दिल्ली आणि उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले. दिल्लीत १६१ जणांनी आपले प्राण गमावले तर उत्तर प्रदेशात १२७ जण हे कोरोनामुळे मृत्युमुखी पडले.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या कारभाराचा त्यांच्याच नेत्यांना वैताग

रडत बाजीराव आणि चाय-बिस्कुटी प्रचार

रेमडेसिवीर पुरवठादारांना ठाकरे सरकारचाच त्रास! आधी धमकी, मग पोलीसांनी उचलले

देशभर विलगीकरण कक्ष उभारायला रेल्वे सज्ज

कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाला डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्वाचे निर्णय हे सरकारकडून घेण्यात आले आहेत. सरकारने लिक्वीड ऑक्सिजनच्या औद्योगिक क्षेत्रातील वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तर भारतीय रेल्वेकडून देशभर विलगीकरण कक्ष उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. राज्यांच्या मागणीनुसार हे कक्ष भारतीय रेल्वेतर्फे उभारण्यात येणार आहेत.

Exit mobile version