कोरोनाचा उद्रेक सुरूच

कोरोनाचा उद्रेक सुरूच

त्यानंतर भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमाने बंद केली. या पार्श्वभूमीवर भारताने मिळवलेले हे यश खूप मोठे.

सोमवारी महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ आढळून आली. सोमवारी राज्यात चोवीस तासांत ४७२८८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर देशात आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेली. सोमवारी भारतात चोवीस तासांत १,०३,५५८ इतके कोरोना रुग्ण वाढले आहेत. कोविड महामारी सुरु झाल्यापासूनची ही आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ आहे. सोमवारी राज्यात २६,२५२ जण कोरोनमुक्त झाले आहेत तर १५५ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस विकेंड लॉकडाऊन असणार आहे तर इतर पाच दिवस निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

देशमुख लगबगीने दिल्लीला..अभिषेक मनू सिंघवींच्या घरी

अनिल देशमुखांचा राजीनामा हे केवळ हिमनगाचं टोक

अखेर अनिल देशमुखांचा राजीनामा

कुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय?

राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.

तर आठवड्याचे उर्वरित पाच दिवसही नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. या कालावधीत दिवसा जमावबंदी असेल तर रात्री संचारबंदी असणार आहे. रात्री ८ ते सकाळी ७ कोणालाही बिना कारणाचे रस्त्यावर फिरता येणार नाहीये. वित्तीय सेवा सोडून सर्व खासगी कार्यालये वर्क फ्रॉम होम तत्वावर कार्यरत राहतील तर सरकारी कार्यालये ५०% क्षमतेने कार्यरत राहतील. करमणुकीची स्थळे, मॉल्स, धार्मिक स्थळे, क्रीडा संकुले, सभागृहे इत्यादी बंद राहतील. उपहारगृहे, बार पूर्णपणे बंद राहतील तर हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेते पार्सल सेवा सुरु ठेवू शकतात. ई कॉमर्स सेवा सुरु राहील. तर एका इमारतीत ५ पेक्षा जास्त रुग्ण असतील तर त्याला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

Exit mobile version