सौरऊर्जेच्या शर्यतीत भारताने जपानला टाकले मागे!

नवव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर

सौरऊर्जेच्या शर्यतीत भारताने जपानला टाकले मागे!

भारत सन २०२३मध्ये जपानला मागे टाकून जगभरातील तिसरा सर्वांत मोठा आणि ऊर्जा उत्पादक देश ठरला आहे, असे जागतिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या एका संशोधन संस्थेने त्यांच्या अहवालात हे नमूद केले आहे. भारत सन २०१५मध्ये सौरऊर्जानिर्मिती नवव्या स्थानी होता. भारताने गेल्या काही वर्षांत सौरऊर्जानिर्मितीला महत्त्व दिल्याने हे यश मिळाले आहे.
एंबरने ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू हा अहवाल सादर केला आहे.

त्यानुसार, सन २०२३मध्ये जागतिक ऊर्जा उत्पादनात ५.५ टक्के वाटा सौरऊर्जेचा होता. जागतिक ट्रेंडनुसार, भारतात गेल्या वर्षी एकूण ऊर्जा उत्पादनात सौरऊर्जेचा वाटा ५.८ टक्के होता. पवनचक्की आणि सौरऊर्जेत उल्लेखनीय वाढ झाल्याने जागतिक वीजउत्पादनात नवीकरणीय ऊर्जेचा वाटा ३० टक्क्यांहून अधिक आणि पूर्ण स्वच्छ उत्पादन (अणुऊर्जेसह) सुमारे ४० टक्क्यांनी वाढला आहे.

हे ही वाचा:

कट्टरतावादी इस्लामी जमावाचा अहमदाबादमधील निश्कल्की मंदिरावर प्राणघातक हल्ला!

‘पाईपने भरलेल्या ट्रकमध्ये सापडले ८ कोटी’

“पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आला पाहिजे, आम्ही त्यासाठी वचनबद्ध”

एअर इंडियाच्या रजेवर गेलेल्या २५ कर्मचाऱ्यांना कायमची ‘रजा’

त्यामुळे विजेतील कार्बन तीव्रतेचे प्रमाण विक्रमी घटले आहे. सन २००७मध्ये कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जितके होते, त्यापेक्षा या प्रमाणात आता १२ टक्के घट झाली आहे. सन २०२३मध्ये नवीकरणीय ऊर्जा उत्पादनाची वाढ आणखी होऊ शकली असती, मात्र चीन आणि जगभरातील अन्य भागांमध्ये दुष्काळ आल्यामुळे जलविद्युत उत्पादनात गेल्या पाच वर्षांतली सर्वाधिक घट दिसून आली. भारत हा जगभरातील सर्वांत स्वस्त सौर ऊर्जा निर्मितीचा देश आहे. तर, सर्वांत महागडी सौरऊर्जानिर्मिती कॅनडात होते.

भारतात वेगवान वाढ
भारतात सन २०२३मध्ये सौरऊर्जा उत्पादनात जी वाढ दिसून येत आहे, ती जगभरातील सर्वांत मोठी चौथी वाढ आहे. भारत यात चीन, अमेरिका आणि ब्राझीलच्या मागे आहे. या चारही देशांच्या सौरऊर्जा वृद्धीचा वाटा सन २०२३मध्ये ७५ टक्के राहिला. सन २०२३मध्ये जागतिक सौरऊर्जा उत्पादनात सन २०१५च्या तुलनेत सहापट अधिक वाढ झाली तर, भारतात ११ टक्के अधिक वाढ झाली. भारतात विजेच्या उत्पादनात सौरऊर्जेचे योगदान सन २०१५मध्ये ०.५ टक्के होते, जे सन २०२३मध्ये वाढून ५.८ टक्के झाले.

Exit mobile version