रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने परिणामी गेल्या वर्षी जगातील लष्करी खर्चात वाढ झाली. २०२२ मध्ये लष्करी खरेदीवर १८३ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी खर्च आहे. या खर्चात भारत चौथ्या स्थानावर आहे. त्यात अमेरिका, त्यानंतर चीन, रशिया, भारत आणि सौदी अरेबिया यांचा क्रमांक लागतो.
सलग आठव्या वर्षी जगभरात सैन्यावरील खर्चात वाढ होताना दिसत आहे. रशियाच्या भीतीने युक्रेनने आपला संरक्षण खर्च ६ पटीने वाढवला आहे. त्या भीतीमुळे फिनलँड नाटोचा ३१ वा सदस्य बनला. फिनलँडने आपल्या संरक्षण बजेटमध्ये ३६ टक्के कपात केली. तर लिथुआनियामध्ये २७ टक्के वाढ झाली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात ही माहिती दिलेली आहे.
सर्वात जास्त खर्च करणारे पाच देश
अमेरिका : ७१ लाख करोड रुपये
चीन: २३ लाख करोड रुपये
रशिया : ७ लाख कोटी करोड रुपय
भारत: ६ लाख करोड रुपये
सौदी अरेबिया : ५.८ लाख करोड कोटी रुपये
चीनचा संरक्षण खर्च का वाढला?
भारतीय सीमेवर चीन सातत्याने कुरापती करत असतो. त्याचबरोबर तैवानवर हल्ला करण्याची चीनने पूर्ण तयारी केली आहे. चीनने सलग २८ व्या वर्षी लष्करी बजेटमध्ये वाढ केली आहे. त्याचे बजेट आता २३ लाख कोटी रुपये झाले आहे. दक्षिण चीन समुद्र आणि तैवानसोबतचा तणाव ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
हेही वाचा :
डेथ वॉरंट निघालेय, पण नेमके कोणाचे…?
मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता
पाकिस्तानात पोलिस स्टेशनवर आत्मघाती हल्ला, १२ पोलिस ठार, ४० जखमी
अजिंक्य रहाणे परतला, आयपीएल, रणजीतील दमदार कामगिरी फळली
२०२२ मध्ये सर्वाधिक खर्च करणारे तीन देश
जगाच्या लष्करी खर्चापैकी ५७ टक्के खर्च फक्त तीन देश करत आहेत. यात अमेरिका, रशिया आणि चीन यांचा समावेश आहे. सर्वात ऐतिहासिक वाढ युरोपियन देशांमध्ये दिसून आली आहे. युरोपीय देशांनी गेल्या ३० वर्षांतील सर्वात मोठी वाढ केली आहे. युरोपीय देशांनी आपल्या संरक्षण बजेटमध्ये १३ टक्के वाढ केली आहे. युरोपीय देशांनी आपल्या संरक्षण बजेटमध्ये १३ टक्के वाढ केली आहे. याचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध.
भारताचा खर्च सातत्याने का वाढत आहे?
भारतीय सैन्याची स्थिती ४०-५० वर्षे जुनी नाही. जमीन असो, पर्वत असो, वाळवंट असो, आकाश असो, अंतराळ असो वा समुद्र, सगळीकडे आपली शस्त्रे धुमाकूळ घालू शकतात. चीन आणि पाकिस्तानने मिळून हल्ला केल्यास भारताच्या तिन्ही सैन्यांकडे अशी काही शस्त्रे आहेत, जी शत्रू देशांची दाणादाण उडवू शकतात. या शस्त्रांमुळे चीन आणि पाकिस्तान मोठ्या हल्ल्याचा विचारही करू शकत नाहीत. चीन आणि पाकिस्तानविरुद्नध गरज पडल्यास हल्ला करण्यासाठी स्वदेशी शस्त्रांची गरज आहे. त्यामुळेच भारताच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ झाली आहे.