१२ मिराज-२००० लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत भारत-कतार दरम्यान चर्चा!

भारतीय हवाई दलाचा मुख्य आधार मिराज

१२ मिराज-२००० लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत भारत-कतार दरम्यान चर्चा!

दिल्लीमध्ये शुक्रवारी भारत आणि कतारच्या प्रतिनिधींना १२ मिराज २००० विमानांच्या सद्यपरिसथितीबाबत माहिती देण्यात आली. सर्व विमाने सुस्थितीत आहेत आणि आणखी बराच काळ ते कार्यान्वित राहू शकतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या दोन्ही देशांदरम्यान १२ लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय आणि कतार या दोन्ही विमानांचे इंजिन एकसारखे आहेत आणि जर भारताने ही विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याची देखभाल करणे भारताला सोपे पडेल. कतार १२ लढाऊ विमानांसाठी पाच हजार कोटी रुपयांची मागणी करत आहे. मात्र भारत योग्य किमतीतच ही लढाऊ विमाने विकत घेण्यासाठी उत्सुक आहे. कतारची विमाने भारताची क्षेपणास्त्रे व उड्डाण संचलनासाठी अतिरिक्त इंजिनाला सुसंगत ठरतील, अशा पद्धतीने सादर केली जात आहेत.

हे ही वाचा:

अटल सेतूवर भेगा पडल्याचे वृत्त खोटे!

अमेरिकेत किराणा दुकानात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू, १० जण जखमी!

इस्रायल-हमासदरम्यान भीषण युद्धाला सुरुवात!

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

विमानांचा उपयोग उड्डाणासाठी केला जाणार आहे. विमानांची देखभाल करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय हवाई दलाला करोनाकाळात एका फ्रान्सच्या विक्रेत्याकडून सेकंड हँड व्यापारात मोठ्या संख्येने सुटे भाग आणि साहित्य मिळाले होते. तर, कतारसोबत केलेल्या व्यवहारात भारतीय हवाई दलाला मिराजची संख्या ६०पर्यंत नेण्यास मदत मिळेल.

भारतीय हवाई दलाचा मुख्य आधार मिराज
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या तळासह मिराज लढाऊ विमानाचा ताफा भारतीय हवाई दलाचा मुख्य आधार ठरला आहे. मिराज लढाऊ विमानांमुळे कारगिल युद्ध आणि बालाकोट हवाई हल्ल्यासारख्या प्रमुख मोहिमेला बळ मिळाले आहे. तसेच, चीनदरम्यानच्या वास्तव रेषेवर मिराज लढाऊ विमानांची मदत मोलाची ठरली आहे.

Exit mobile version