वनडे वर्ल्डकपची भारत-पाकिस्तान झुंज १४ ऑक्टोबरला

बीसीसीआयने बदलले वेळापत्रक

वनडे वर्ल्डकपची भारत-पाकिस्तान झुंज १४ ऑक्टोबरला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित वनडे वर्ल्डकप सामना १५ ऑक्टोबरऐवजी आता १४ ऑक्टोबरला खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही लढत याआधी १५ ऑक्टोबरला होणार हे निश्चित होते पण त्या दिवशी घटस्थापना असल्यामुळे पोलिसा बंदोबस्तावर ताण येऊ शकेल हे लक्षात आल्याने लढत एक दिवस आधी घेण्यात आली आहे.

 

 

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यासंदर्भात सांगितले की, तीन सदस्य क्रिकेट बोर्डांनी आयसीसीला या कार्यक्रमात बदल हवे असल्याचे कळविले. त्यानुसार बदल केले आहेत. पण फक्त तारखा आणि वेळ यातच बदल करण्यात आले आहेत. सामन्याची ठिकाणे बदलण्यात येणार नाहीत. जर सामन्यांमध्ये सहा दिवसांचे अंतर असेल तर ते ४-५ दिवसावर आणण्याचे आमचे काम असे. येत्या ३-४ दिवसांत या वेळापत्रकाचे चित्र पुरेसे स्पष्ट होईल. अर्थात, हे बदल आयसीसीशी बोलूनच केले जातील.

हे ही वाचा:

पुण्यातून पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून ५०० जीबी डेटा, ड्रोन फुटेज जप्त

पीक विमा भरण्यासाठी केंद्राकडून आणखी काही दिवसांची मुदतवाढ

‘फक्त शाकाहारी’ वरून बॉम्बे आयआयटीत गोंधळ !

लवकरच चंद्र करणार चांद्रयानाचे स्वागत; चंद्राच्या कक्षेपासून फक्त सहा दिवस दूर

 

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळविला जाणार आहे. मात्र १५ ऑक्टोबरला घटस्थापना असल्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर मोठा ताण असेल असे स्थानिक पोलिसांनी म्हटले होते. एकाचवेळी हा खूप महत्त्वाचा सामना आणि शहरात नवरात्रीची धामधूम या सगळ्या परिस्थितीनुसार त्या दिवशी सामना आयोजित करणे शक्यच झाले नसते. त्यामुळे तारखा बदलण्याची मागणी होऊ लागली. पण ही बातमी आल्यानंतर आता त्याठिकाणी जे सामन्यासाठी हॉटेल बुकिंग करणार आहेत, त्यांनाही आपल्या तारखांमध्ये बदल करावा लागणार आहे. विमानांच्या तिकिटांतही बदल करावे लागतील.

 

 

अर्थात, असा सामना बऱ्याचा काळानंतर भारतात होत असल्यामुळे प्रेक्षक, क्रिकेटचाहते, खेळाडू अशा सगळ्यांमध्ये प्रचंड कुतुहल आहे. भारताने आतापर्यंत वनडे वर्ल्डकपमध्ये एकही सामना पाकिस्तानविरुद्ध गमावलेला नाही. ७-० अशी भारताची विजयी मालिका वर्ल्डकपमध्ये राहिलेली आहे. याआधी, २०१९च्या वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान भिडले होते.

Exit mobile version