भारत विजयापासून पाच विकेट्स दूर  

भारत विजयापासून पाच विकेट्स दूर  

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस होता. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील खराब फलंदाजी प्रदर्शनामुळे हा सामना आता भारताच्या हातात आहे, असे चित्र आहे. पहिल्या डावात भारताने ३२५ धावा करत सामन्याची सुरुवात दमदार केली. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी किवींवर अंकुश ठेवत न्यूझीलंडच्या संघाला केवळ ६२ धावांमध्ये तंबूत धाडले. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आज तिसऱ्या दिवशी भारताने दुसरा डाव ७ बाद २६७ असा घोषित केला आणि न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य दिले. ५४० धावांचे आव्हान देताना दुसऱ्या डावात मयंक अग्रवाल याने १०८ चेंडूत ६२ धावा केल्या तर चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी ४७ धावा फलकावर जोडल्या. कर्णधार कोहलीने ८४ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि वृद्धिमान सहा यांना धावा करण्यात फारसे यश आले नसून त्यांनी अनुक्रमे १४ आणि १३ धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेल याने तुफानी खेळी करत २६ चेंडूत चार षटकार आणि तीन चौकारांसह ४१ धावा केल्या.

हे ही वाचा:

…आणि डॉलरऐवजी त्याला मिळाले कागदाचे तुकडे !

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासले

शिवमंदिर हटविल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी

कसली स्टँड अप कॉमेडी, हा तर अजेंडा

पहिल्या डावात ऐतिहासिक कामगिरी करणारा अजाझ पटेल याने दुसऱ्या डावात भारताच्या चार फलंदाजांना बाद केले तर रचिन रवींद्र याने तीन फलंदाजांना तंबूत धाडले. ५४० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने दिवसअखेर १४० धावा करून आपले पाच फलंदाज गमावले आहेत. भारताचा अनुभवी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले तर, अक्षर पटेल याने एका फलंदाजाला बाद केले आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यातील विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात ४०० धावांची आवश्यकता आहे. तर भारताला पाच विकेट्सची गरज आहे. सध्या तरी या सामन्यामध्ये भारताचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.

Exit mobile version