भारतामध्ये कोरोनाचा कहर हळूहळू वेगवेगळ्या राज्यांत वाढू लागला आहे. अशावेळी लसीकरण हा प्रभावशाली मार्ग असल्याने सरकारने वेगाने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अधिक बळ मिळण्यासाठी सरकार लवकरच आणखी एका लसीच्या वापराला परवानगी देईल अशी चिन्हे दिसत आहेत.
भारत सध्या जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवत आहे. भारतात सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया तयार करत असलेल्या ऍस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसींचा वापर करून लसीकरण मोहिम राबवली जात आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न म्हणून आणखी एका लसीची उपलब्धता करून दिली जाणार आहे.
हे ही वाचा:
मोदी सरकारची पीएलआय योजना ठरली ‘स्मार्ट’
मोदी सरकारची पीएलआय योजना ठरली ‘स्मार्ट’
एएनआयच्या वृत्तानुसार एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेली माहितीनुसार यामध्ये रशियाच्या स्पुतनिक लसीचा नंबर लागू शकतो. त्याबरोबरच जॉन्सन अँड जॉन्सन, नोवावॅक्स, झायडस कॅडिला आणि भारत बायोटेक यांच्या लसींचा देखील विचार लवकरच केला जाऊ शकतो. त्यामुळे भारताला एकूण पाच नव्या लसी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापैकी नोवावॅक्स लसीची निर्मीती सिरम इन्स्टिट्युटचीच आहे, तर भारत बायोटेककडून इन्ट्रानसल नावाची आणखी लस उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
या लसींपैकी स्पुतनिक लस जुन महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सारे काही ठरल्याप्रमाणे पार पडले तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाचही लसी उपलब्ध होतील.
आजपासून भारताने १४ एप्रिल पर्यंत लसोत्सव साजरा करायला सुरूवात केली आहे. भारताने गेल्या ८५ दिवसात दहा कोटी लोकांना लस दिली आहे. हे सर्वात वेगाने करणारा भारत पहिला देश ठरला आहे.