भारत लसीकरणाच्या नव्या शिखराकडे!

भारत लसीकरणाच्या नव्या शिखराकडे!

देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत भारताने लसीकरण मोहिमेचे वेगवेगळे टप्पे गाठले आहेत. पुढील आठवड्यापर्यंत देश लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार ९६ कोटीहून अधिक डोस दिले गेले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग लक्षात घेता पुढील आठवड्यापर्यंत १०० कोटी डोसचा ऐतिहासिक आकडा गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आता आरोग्य मंत्रालयाने सेलिब्रेशनची तयारी सुरू केली असून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा सरकार विचार करत असल्याची माहिती सुत्रांमार्फत समोर आली आहे. लसीकरण मोहीमेच्या या यशाची घोषणा बस स्थानके, बंदरे, मेट्रो स्टेशन, विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या बसेसमध्ये केली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना दिली.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील सरकारी बंद विरोधात उच्च न्यायलायत याचिका

… म्हणून मुंबई पोलीस समीर वानखेडेंना समन्स पाठवणार

नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार?

आव्हाडांना हाकला!

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशभरात १८ ते ४४ वयोगटातील तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु असून आतापर्यंत ३८ कोटी ९९ लाख ४२ हजार ६१६ लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर याच वयोगटातील १० कोटी ६९ लाख ४० हजार ९१९ लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या आकडेवारीनुसार देशातील एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. तसेच लहान मुलांच्या लसीकरणाबाबत तज्ज्ञांचे मत घेतले जात आहे.

Exit mobile version