भारताने बनवली जगातील पहिली डीएनए लस

भारताने  बनवली जगातील पहिली डीएनए लस

देशातील आघाडीची औषध निमिर्ती कंपनी झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी या लसीला अखेर औषध महानियंत्रक अर्थात डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. झायकोव्ह-डी लसीने सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे डीजीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ही लस पूर्णपणे स्वदेशी असून डीएनएवर आधरित असणारी जगातील पहिली लस आहे. देशात आणखी एक लस उपलब्ध झाल्यामुळे आता लसीकरणाला गती येण्याची शक्यता आहे.

मागील काही आठवड्यांपासून झायडस कॅडिला कंपीन त्यांच्या झायकोव्ह-डी या डीएनएवर आधारीत असलेल्या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करत होती. त्यासाठी कंपनीने डीसीजीआयकडे रितसर अर्जसुद्धा केला होता. तोच अर्ज मंजूर करुन डीसीजीआयने झायकोव्ह-डी या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. दिलेल्या मंजुरीनुसार झायकोव्ह-डी ही लस आता १२ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना तसेच १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व नागरिकांना देता येईल.

झायडस कॅडिलानं डीएनए आधारित कोरोना लसीची निर्मिती केली आहे. डीएनएवर आधारित असणारी कोरोनावरील जगातील ही पहिली लस आहे. या लसीमध्ये कोरोना विषाणूच्या डीएनएच्या जेनेटिक कोडचा वापर करण्यात आला आहे. यामुळे लस घेतल्यानंतर व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

हे ही वाचा:

पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन

लोकप्रतिनिधींच्या दबावाला कंटाळून तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा! ऑडिओ क्लिप व्हायरल

एकट्या मोदींविरोधात विरोधकांची एकता

अमेरिकेच्या माघारीबद्दल त्या शहीद सैनिकाच्या वडिलांना दुःख

झायडस कॅडिलाच्या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ व्या दिवशी तर तिसरा डोस ५६ व्या दिवशी घ्यावा लागणार आहे. झायडस कॅडिलाकडून दोन डोसबाबात संशोधन सुरु आहे.

Exit mobile version