भारतीय क्रिकेट संघाला टी-२० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत हार सहन करावी लागली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला प्रतिस्पर्ध्यांचा एकही फलंदाज बाद करता आला नाही. भारताने ६ बाद १६८ धावा केल्या तर इंग्लंडने एकही फलंदाज न गमावता १७० धावा केल्या. मात्र या पराभवामुळे अंतिम फेरीत धडकण्याचे भारताचे स्वप्न भंग पावले. आता अंतिम फेरीत इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल. १३ नोव्हेंबरला हा सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान असाच अंतिम सामना होणार ही अटकळ मात्र खोटी ठरली.
यानिमित्ताने भारताला टी-२० वर्ल्डकपमधील पहिली स्पर्धा जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आठवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तेव्हा आपण पाकिस्तानला अंतिम फेरीत पराभूत करून विश्वचषकावर नाव कोरले होते. याच धोनीने २०११मध्ये भारताला वनडे वर्ल्डकप जिंकून देण्यातही महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे धोनीसारखा कर्णधार आज हवा होता, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या. धोनीसारखा कुणीही नाही, असे म्हणत लोकांनी विद्यमान कर्णधार रोहित शर्मावर टीका केली. वर्ल्डकप जिंकणे हे सोपे काम नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. धोनीची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे, असेही एका नेटकऱ्याने म्हटले आहे.
महेंद्रसिंग धोनी हा भारताचा महान कर्णधार होता, त्याच्यासारखे कुणीही नाही, अशा शब्दांत लोकांनी धोनीची यानिमित्ताने आठवण काढली. आयसीसीच्या स्पर्धा जिंकणे हे सोपे नसते पण तू ते सोपे करून दाखविलेस, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने व्यक्त केली.
There is only one leader, one captain #GOAT𓃵 MS DHONI 🙌
Winning ICC trophies 🏆 is not as easy as you made us believe, all ict fans missing you #thala 😭😭#TeamIndia #T20WorldCup #SemiFinals #SemiFinalT20WC #Semifinal #INDvsENG #INDvENG #MSDhoni𓃵 #Dhoni #RohitSharma𓃵 pic.twitter.com/JfCFGkP4u5
— Avnii (@Opinion_point_) November 10, 2022
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण केले पण भारताला १६८ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. ही खरेतर झुंज देण्याजोगी धावसंख्या होती पण भारताला इंग्लंडने दादच दिली नाही सलामीवीरांनीच ही धावसंख्या पार करत सहज विजय मिळविला.
Missing MS DHONI captaincy Today 😔 #Dhoni #INDvsENG pic.twitter.com/Lm5zeh2oW1
— Deep Sharma 🇮🇳 (@_thenameisdeep) November 10, 2022
भारताच्या विराट कोहलीने ५० धावांची खेळी केली. त्यात त्याने आपल्या टी-२० कारकीर्दीतील ४ हजार धावांचा टप्पाही पार केला. शिवाय, वर्ल्डकपमधील १०० चौकारही लगावले. हार्दिक पंड्यानेही ६३ धावांची वेगवान खेळी केली पण तीही वाया गेली. इंग्लंडच्या जोस बटलरची ८० आणि ऍलेक्स हॉल्सची ८६ धावांची नाबाद खेळी इंग्लंडला विजय मिळवून देणारी ठरली.