भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आता ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे, पण आता भारतही विजय मिळवू शकतो, अशी सामन्याची स्थिती आहे. त्यामुळे विजेतेपदाची आयसीसीची गदा कुणाकडे येणार याचा निकाल लागण्यासाठी आता काही तासांचा खेळ बाकी आहे. इंग्लंडच्या ओव्हलवर सुरू असलेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ८ बाद २७० धावांवर डाव घोषित करून भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने चौथ्या दिवसअखेर ३ विकेट्स गमावून १६४ धावा केलेल्या आहेत. त्यामुळे भारताला विजयासाठी आणखी २८० धावांची गरज आहे. त्यामुळए सामन्यातील रंगत वाढली आहे. विराट कोहली ४४ आणि अजिंक्य रहाणे २० धावांवर खेळत आहेत.
भारताला पहिल्या डावात केवळ २९६ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे भारत १७३ धावांनी पिछाडीवर पडला होता. तो ऑस्ट्रेलियासाठी वर्चस्व मिळवून देणारा मुद्दा होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या ४६९ धावांचा पाठलाग करताना भारताची चांगलीच दमछाक झाली. १७३ धावांची पिछाडी असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फार कष्ट करावे लागले नाहीत. त्यांनी मोठी धावसंख्या उभारण्याचे लक्ष्यही समोर ठेवले नाही.
२७० धावा झाल्यानंतर त्यांनी डाव घोषित केला. त्यात ऍलेक्स कॅरीच्या नाबाद ६६ धावांचा समावेश होता. या डावात मात्र ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला शतक ठोकता आले नाही. पहिल्या डावात शतक ठोकणारे स्टीव्ह स्मिथ आणि ट्राव्हिस हेड यांना यावेळी अनुक्रमे ३४ आणि १८ धावांवर समाधान मानावे लागले. कॅरी आणि मिचेल स्टार्क यांनी ९३ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळण्याचे भारतीयांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. त्यामुळे ६ बाद १६७ अशा अवस्थेत असलेल्या ऑस्ट्रेलियाला ७ बाद २६० धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. ही त्यांच्यासाठी महत्त्वाची भागीदारी ठरली.
हे ही वाचा:
‘लोकाग्रहास्तव सुप्रिया सुळे कार्याध्यक्षपदी’
सिध्देश्वर तलावात आढळले चतुर्मुखी शिवलिंग!
चॅनेलवर ७२ हूरेंवरील कार्यक्रमात पॅनलिस्टची हाणामारी
पंतप्रधान योजनेला बदनाम करण्यासाठी जेवणात टाकला होता साप
अडीचशेपेक्षा अधिक धावा केलेल्या असल्यामुळे आधीच्या १७३ धावांसह ऑस्ट्रेलियाकडे भक्कम आघाडी होती. शिवाय, दीड दिवसाचा खेळही शिल्लक होता. त्यामुळे त्यांनी लागलीच डाव घोषित करून भारतासमोर आव्हान ठेवले. चहापानाला भारताची स्थिती १ बाद ४१ आहे आणि भारताला आणखी ४०३ धावांची आवश्यकता आहे.
स्कोअरबोर्ड ऑस्ट्रेलिया पहिला डाव ४६९ (स्टीव्ह स्मिथ १२१, हेड १६३, कॅरी ४८, सिराज १०८-४, शमी १२२-२, ठाकूर ८३-२, जाडेजा ५६-१) भारत पहिला डाव २९६ (अजिंक्य रहाणे ८९, जाडेजा ४८, ठाकूर ५१, कमिन्स ८३-३, स्टार्क ७१-२, बोलँड ५९-२, ग्रीन ४४-२) ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ८ बाद २७० डाव घोषित (कॅरी ६६, ग्रीन २५, स्मिथ ३४, लाबुशान ४१, जाडेजा ५८-३, उमेश यादव ५४-२, शमी ३९-२) भारत दुसरा डाव ३ बाद १६४ (कोहली खेळत आहे ४४, अजिंक्य रहाणे २०). भारताला २८० धावांची गरज