भारताने लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे

भारताने लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे

कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणात एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला मागे टाकत भारताने नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करत देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. सर्वांना लस आणि मोफत लस या घोषणेचा पुनरुच्चारही मोदींनी केला आहे. अमेरिकेत ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ लसींचे डोस दिले आहेत, तर भारताने आज सकाळपर्यंतच ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसींचे डोस दिले आहेत.

भारतात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण अभियानाची सुरुवात १६ जानेवारी २०२१ रोजी तर अमेरिकेत लसीकरण अभियानाला १४ डिसेंबर २०२० रोजी सुरुवात झाली होती. भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल ३२.३६ कोटींचा मैलाचा टप्पा पार केला. उपलब्ध अहवालानुसार आज सकाळी ७ वाजेपर्यंत ४३ लाख २१ हजार ८९८ सत्रांमध्ये, एकूण ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसी देण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासात १७ लाख २१ हजार २६८ लसी देण्यात आल्या आहेत.

कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला २१ जून २०२१ रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केन्द्र सरकार वचनबद्ध आहे. भारतात गेल्या २४ तासात ४६ हजार १४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग २१ दिवस १ लाखापेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे. भारतात सक्रीय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या ५ लाख ७२ हजार ९९४ इतकी आहे.

कोविड -१९ संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत असल्याने सलग ४६ व्या  दिवशी भारतात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासात ५८,५७८ रुग्ण बरे झाले. दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत गेल्या २४ तासात, १२ हजार ४३० रुग्ण बरे झाले.

भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण २ कोटी ९३ लाख ०९,६०७ तर गेल्या २४ तासात ५८,५७८ रुग्ण कोविड-१९ संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर ९६.८० टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात देशात १५ लाख ७०,५१५ चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण ४०.६३ कोटींपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

भारताने केली अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

बंगलोसेनेतील अजून एका नेत्याचा अनधिकृत बंगला?

ट्विटरने पुन्हा जम्मू-काश्मीर आणि लडाख भारतापासून वेगळा दाखवला

रेस ट्रॅकवर गाड्या का आणल्या? याचे थक्क करणारे स्पष्टीकरण

देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हीटी २.८१ टक्के तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर २.९४ टक्के आहे. सलग २१ व्या दिवशी हा ५ टक्के पेक्षा कमी आहे.

Exit mobile version