‘तू ठान ले’ भारताच्या ऑलिम्पिक गीताचे दिमाखात लाँचींग

‘तू ठान ले’ भारताच्या ऑलिम्पिक गीताचे दिमाखात लाँचींग

आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या भारताच्या अधिकृत गीत बुधवारी लाँच करण्यात आले आहे. भारताचे क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते हे लाँचींग पार पडले. ‘तू ठान ले, जीत को अंजाम दे’ असे या गाण्याचे बोल आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायक मोहित चौहान यांनी हे गीत संगीतबद्ध केले असून त्यांनीच हे गीत गायले देखील आहे. तर त्यांच्या पत्नी प्रार्थना गेहलोत यांनी या गीताचे बोल लिहिले आहेत.

जुलै महिन्यापासून टोकियो येथे होऊ घातलेल्या जगातील महत्वाच्या क्रीडास्पर्धांपैकी एक असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जगभरातील क्रीडापटूंनी आपली कंबर कसली असून भारतीय खेळाडूही या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. भारत सरकारतर्फेही आवश्यक त्या सगळ्या गोष्टी केल्या जात असून बुधवार, २३ जून रोजी या स्पर्धेसाठीचे भारताचे अधिकृत गीत लाँच करण्यात आले आहे. हे गीत आपल्या खेळाडूंसाठी प्रोत्साहन देणारे ठरणार आहे.

हे ही वाचा:

धडधाकट झाडांवर पालिकेची कुऱ्हाड

राहुल गांधींना कळेना पूर आणि तुंबलेल्या पाण्यातला फरक

नवी मुंबई विमानतळ, भूमिपुत्रांचे घेराव आंदोलन सुरु

बापरे! मोबाईल चोरामुळे इसम गंभीर जखमी

या प्रसंगी बोलताना केंद्रीय किरेन रिजीजू यांनी या मागची संकल्पना स्पष्ट केली. “टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यास्तही आणि प्रोत्साहित करण्यासाठी साऱ्या देशाने एकत्र आले पाहिजे ही सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. ऑलिम्पिकसाथीचे हे अधिकृत गीत हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.” असे रिजीजू म्हणाले.

याच वेळी त्यांनी #Cheer4India या अभियानाचीही सुरुवात केली आहे. या अभियानाच्या अंतर्गत क्रीडा मंत्रालयातर्फे देशभर ऑलिम्पिक खेळांवर आधारित प्रश्नोत्तर चाचण्या, सेल्फी पॉईंट, वादविवाद स्पर्धा, आणि चर्चा यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

Exit mobile version