जगभरातील देशांचा संरक्षणावरील खर्च सातत्याने वाढतो आहे. सन २०२३मध्ये हा आकडा दोन हजार ४४३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. तर, अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत हा संरक्षण क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करणारा चौथा देश ठरला आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सिपरी)च्या अहवालानुसार, सन २०२३मध्ये जगभरातील संरक्षण क्षेत्रावरील खर्चात ६.८ टक्के वाढ झाली आहे. संरक्षण क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशात अमेरिका (९१६ अब्ज डॉलर), चीन (२९६ अब्ज डॉलर), रशिया (१०९ अब्ज डॉलर), भारत (८४ अब्ज डॉलर), सौदी अरेबिया (७६ अब्ज डॉलर), ब्रिटन (७५ अब्ज डॉलर), जर्मनी (६७ अब्ज डॉलर), यूक्रेन (६५ अब्ज डॉलर), फ्रान्स (६१ अब्ज डॉलर) आणि जपान (५० अब्ज डॉलर) यांचा समावेश आहे. या यादीत पाकिस्तान ३०व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने संरक्षण क्षेत्रावर ८.५ अब्ज डॉलर खर्च केले आहेत.
सन २००९नंतर पहिल्यांदाच अमेरिका, युरोप, मध्यपूर्वेकडील देश, आफ्रिका आणि आशियामध्ये संरक्षणावरील खर्च पहिल्यांदाच वाढल्याचे स्पिरीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशांकडून लष्करी शक्ती वाढवण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. मात्र ते सातत्याने बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून क्रिया आणि प्रतिक्रियेची जोखीमही घेत आहेत, असे स्पिरीचे वरिष्ठ संशोधक नॅन टिआन यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
‘काँग्रेस आणि सपाला पाच वर्षांच्या रजेवर पाठवा, म्हणजे ते माफियांच्या कबरीवर फातिहा वाचू शकतील’
हाँगकाँग, सिंगापूरमध्ये बंदीनंतर एमडीएच, एव्हरेस्टच्या मसाल्यांची तपासणी होणार
तैवानला पुन्हा भूकंपाचे धक्के; १७ जण जखमी
…तर साहेबांनी अजितदादांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी तरी दिली असती का?
चीनचा संरक्षण क्षेत्रावर भारताच्या चारपट खर्च
भारत आताही चीनच्या तुलनेत चारपट कमी खर्च संरक्षण क्षेत्रावर करतो आहे. भारतासमोर लढाऊ विमाने, पाणबुड्या, हेलिकॉप्टरसह अत्याधुनिक शस्त्रे, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि रात्रीच्या वेळी लढण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा लष्करी साधनांची कमतरता भरून काढण्याचे आव्हान आहे. तर, दुसरीकडे चीन जमीन, हवा आणि सागरी सुरक्षेसह आण्विक शक्ती, अवकाश आणि सायबर क्षेत्रातील आपल्या सैनिकांचे अत्याधुनिकीकरण करते आहे. चीनने त्यांच्या संरक्षण क्षेत्रावरील अर्थसंकल्पात सलग २९व्या वर्षी वाढ केली आहे.