भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या आपल्या निवडणूक रॅलीत चीन आणि पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधत आहेत.पाकिस्तानला वारंवार दहशतवाद्यांना आळा घालण्याची मागणी करणाऱ्या भारताने आता मदतीचा प्रस्ताव दिला आहे.जर पाकिस्तान दहशतवाद्यांना रोखू शकत नसेल तर भारत मदत करण्यास तयार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मंत्री राजनाथ सिंह बोलत होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, दहशतवाद्यांचा अवलंब करून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला.ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादावर नियंत्रण ठेवले पाहिजे. पाकिस्तानला दहशतवादावर नियंत्रण ठेवता येत नाही असे वाटत असेल तर शेजारी देश भारताकडे सहकार्य मागू शकतात.दहशतवाद रोखण्यासाठी भारत त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे.
हे ही वाचा:
गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपमध्ये प्रवेश!
तिकीट मिळाले नसल्याने राजीनामा दिलेल्या निशा बांगरे यांचा पुन्हा नोकरीसाठी अर्ज
‘भारत-चीन यांच्यातील प्रदीर्घ सीमावादावर तातडीने लक्ष देण्याची गरज’
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी के.कविता यांना सीबीआयकडून अटक!
उत्तर प्रदेशाच्या सहारनपूरमध्ये भाजप उमेदवाराच्या बाजूने निवडणूक प्रचारादरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण जगात भारताचा मान वाढला आहे.या आधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारत जेव्हा आपली भूमिका मांडत असे तेव्हा कोणीही गांभीर्याने घेतले जात न्हवते.मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.आज जग कान उघडे ठेवून भारताचे शब्द ऐकत आहे.यावरून हे दिसून येते की जगभरात भारताचा दर्जा वाढला आहे.
संरक्षण मंत्र्यांनी चीन वर देखील तोफ डागली.भारताची जमीन चीनने बळकावली आहे का? त्यावर उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या सरकारच्या काळात एक इंचही जमीन कोणी काबीज करू शकत नाही. आमची जमीन आम्ही कधीही जाऊ देणार नाही. पीओकेचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले, ‘पीओके आमचा होता, आहे आणि राहील.’