लॉर्ड्स कसोटी: इंग्लंडची झुंज सुरु, पण पारडे भारताचेच जड

लॉर्ड्स कसोटी: इंग्लंडची झुंज सुरु, पण पारडे भारताचेच जड

लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसा अखेर इंग्लंडचा स्कोर ३ बाद ११९ असा आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट नाबाद ४८ धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. तर जॉनी बेर्स्ट्रोव त्याला साथ देत आहे.

भारत आणि इंग्लंड मधील दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस सुरू झाला आणि पहिल्या दोन ओव्हरमध्येच सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले. भारताचा शतकवीर फलंदाज लोकेश राहुल हा पहिल्या षटकात बाद झाला. तर पाठोपाठ उपकर्णधार अजिंक्य राहणे हा माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. भारताचा डाव आटोपला तेव्हा धावफलकावर ३६४ भावा चढल्या होत्या.

हे ही वाचा:

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग ठरला

मुंबई महापालिकेत बदल्या, बढत्यांमध्ये घोटाळा?

ट्विटर इंडिया प्रमुखांची उचलबांगडी

कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?

या धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड कडून बर्न्स आणि सिबली हे दोन सलामीवीर उतरले. त्यापैकी सिबली हा अवघ्या अकरा धावा करून बाद झाला. तर त्याच्या पाठोपाठ हसिब हमिद हा पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. पण त्यानंतर बर्न्स आणि कर्णधार जो रूट यांनी इंग्लंड संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. बर्न्स हा ४९ धावांवर बाद झाला असून रूट अजूनही खेळत आहे. भारताकडून मोहम्मद सिराज याने दोन गडी बाद केले असून, एक बळी शमीच्या नावावर आहे.

Exit mobile version