‘पंतप्रधान मोदी सर्व देशांना एकत्र आणतील’

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींवर असलेला विश्वास व्यक्त केला आहे.

‘पंतप्रधान मोदी सर्व देशांना एकत्र आणतील’

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने जी-20 परिषदेचे अध्यक्षपद १ डिसेंबरपासून स्वीकारले. यानंतर भारताचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत जागतिक स्तरावर सर्वसमावेशक, महत्त्वकांक्षी कृती केंद्रित आणि निर्णायक आधारित कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. यांच्या ट्विटनंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींवर असलेला विश्वास व्यक्त केला आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जगात शांतता नांदण्यासाठी माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व देशात एकजूट निर्माण करतील, असा विश्वास मॅक्रॉन यांनी व्यक्त केला आहे. मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलिगंन देतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत मॅक्रॉन यांनी म्हटले आहे की, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य यासाठी भारताने जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे! माझे मित्र नरेंद्र मोदी आम्हाला सर्वाना एकत्र आणतील. तसेच ते शांतता आणि अधिक शाश्वत जग निर्माण करतील यावर माझा विश्वास आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

त्यासोबतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीसुद्धा पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत हा अमेरिकेचा मजबूत भागीदार असणारा देश आहे. त्यामुळे जी-20 च्या भारताकडील अध्यक्षपदादरम्यान माझे मित्र पंतप्रधान मोदी यांना मी पाठिंबा देण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हवामान, ऊर्जा आणि अन्न संकट यांसारख्या समस्यांमधील आव्हानांचा आम्ही एकत्रित सामना करू आणि सर्वसमावेशक, शाश्वत विकास वाढीसाठी प्रयत्न करू असे देखील बायडेन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा : 

‘या’ दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

अखेर इराणने हिजाब कायदा बदलण्याचा घेतला निर्णय

जुळ्या बहिणींशी लग्न करणं तरुणाला भोवणार

ईडीकडून अकरा कोटींची सुपारी जप्त

दरम्यान, जी-20 मध्ये जगभरातील आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या विविध देशांचा समूह असतो. याचे अध्यक्षपद आता भारताने औपचारिकपणे स्वीकारले आहे. येणाऱ्या संपूर्ण वर्षभरात भारत जी-20 चे अध्यक्षपद सांभाळणार आहे. विशेष म्हणजे भारत जगाच्या ७५ टक्क्यांहून अधिक व्यापार आणि जगाच्या दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व आता करणार आहे.

Exit mobile version