दक्षिण आशियातील सर्वाधिक रामसार क्षेत्र भारतात

दक्षिण आशियातील सर्वाधिक रामसार क्षेत्र भारतात

पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताने आणखीन एक महत्वाचा विक्रम रचला आहे. भारतातल्या आणखीन दोन पाणथळ क्षेत्रांना ‘रामसार साईट’ हा दर्जा देण्यात आला आहे. गुजरातमधील खिजाडिया अभयारण्य आणि उत्तर प्रदेशातील बखर अभयारण्यातील पाणथळ क्षेत्रांना रामसार साईटचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे भारत हा दक्षिण आशियातील सर्वात मोठे रामसार क्षेत्राचे जाळे असलेला देश बनला आहे.

भारतात एकूण ४९ रामसार क्षेत्र आहेत. आधी हा आकडा ४७ इतका होता. पण नव्या दोन रामसार साईट्सची घोषणा झाल्यानंतर हा आकडा ४९ वर गेला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विट करत या संदर्भातील माहिती दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या गोष्टीची दाखल घेत कौतुक केले आहे.

हे ही वाचा:

पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

माघी गणेशोत्सव का साजरा केला जातो?

बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात ट्विट करताना ही एक अप्रतिम बातमी असल्याचे म्हटले आहे. तर दक्षिण आशियातील सर्वात जास्त रामसार क्षेत्र भारतात असणे ही आपल्या जनतेची निसर्ग संवर्धनासाठी असलेली कटिबद्धता दर्शवते असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

रामसार क्षेत्र म्हणजे काय?
रामसार क्षेत्र हे पर्यावरणीयदृष्ट्या आवश्यक अशा स्थानांना प्राप्त होणारे आंतरराष्ट्रीय मानांकन आहे. हे मानांकन २ फेब्रुवारी १९७१ रोजी इराणी शहर रामसार येथे मंजूर करण्यात आलेल्या करारानुसार दिले जाते, आणि ते त्याच नावाने ओळखले जाते.

Exit mobile version