जपानमध्ये सध्या चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला पाच पदके मिळाली आहेत. त्याबरोबर आणखी एका खेळात भारताला अनपेक्षितरित्या पदक पटकवण्याची संधी चालून आली होती. मात्र ही पदकाची संधी निसटली.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची अदिती अशोकचे मेडल अगदी थोडक्यात हुकले आहे. एका स्ट्रोकमुळे तिला कांस्य पदकाने हुलकावणी दिली. अदिती अशोककडून भारताला गोल्फमधील पदकाची अपेक्षा होती. जागतिक क्रमवारीमध्ये १७९ व्या क्रमांकावर असलेल्या अदितीनं या ऑलिम्पिकमध्ये अनेक अव्वल खेळाडूंना मागे टाकले. अदिती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पदकाच्या शर्यतीमध्ये होती. मात्र अखेर शेवटच्या क्षणी तिला पदकाने हुलकावणी दिली. अदिती १५ अंडर २६९ पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर राहिली.
आदितीनं पहिल्या तीन राऊंडमध्ये जोरदार कामगिरी केली होती. अदितीनं शुक्रवारी ३ अंडर ६८ कार्ड खेळले. त्यामुळे ती दुसऱ्या क्रमांकावर होती. अदितीची ही दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. यापूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये ती ४१ व्या क्रमांकावर होती. त्यानंतर तिनं या स्पर्धेत दमदार कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले.
हे ही वाचा:
कोविडची होणार हार, लसीकरण ५० कोटी पार
जम्मू- काश्मिरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
आपात्कालिन वापरासाठी जॉन्सन अँड जॉन्सनकडून देखील अर्ज
या राज्यालाही द्या, भारतीय हॉकीच्या यशाचे श्रेय!
अदितीनं वयाच्या ५ व्या वर्षीच वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोल्फ खेळण्याचं ठरवलं. तिनं वयाच्या ९ व्या वर्षीच पहिली स्पर्धा जिंकली. त्यानंतर १२ व्या वर्षी ती नॅशनल टीमची सदस्य बनली. महिलांची युरोपीयन टूर स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय आहे. २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी ती सर्वात कमी वयाची गोल्फर ठरली.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला आत्तापर्यंत पाच पदके मिळाली आहेत. पहिले रौप्य पदक मीराबाई चानूने २४ ऑगस्ट रोजी जिंकले होते. त्यानंतर पीव्ही सिंधू आणि लवलीना बोरगोहेन यांनी बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक जिंकले. भारतीय पुरुषांच्या हॉकी टीमनं गुरुवारी कांस्य पदकाची कमाई करत भारताला चौथे मेडल मिळवून दिले. त्यानंतर कुस्तीपटू रवी दहियानं भारतासाठी दुसरे रौप्य पदक जिंकले.
A 4️⃣th place finish to end a stellar #Tokyo2020 performance from @aditigolf, so close to a medal finish! 💔
Well done, Aditi. Whole of #IND cheered for you today and the last three days 👏#UnitedByEmotion | #StrongerTogether
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 7, 2021