कोविड विरोधी लसीकरणात भारताने ओलांडला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा

कोविड विरोधी लसीकरणात भारताने ओलांडला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा

कोविड या जागतिक महामारी विरोधात एकमेव उपाय म्हणजे लसीकरण. भारतात २०२१ मध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. नुकतेच या लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले या वर्षभरात भारताने लसीकरण मोहीमेत अनेक विक्रम रचले आहेत. असाच एक महत्त्वाचा टप्पा आत्ताच भारताने लसीकरण मोहिमेत पूर्ण केला आहे.

२०२२ च्या नव्या वर्षापासून भारताने १५ ते १८ या वयोगटातील तरुणांचे लसीकरण सुरू केले. ३ जानेवारी २०२२ पासून सुरू झालेल्या या लसीकरणात आतापर्यंत देशातील १५ ते १८ या वयोगटातील ५०% तरुणांना कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देऊन पूर्ण झाला आहे.

हे ही वाचा:

चित्ररथाबाबत राजकारण होऊ शकते?

व्यंगचित्रकार नारायण देबनाथ यांचे निधन

महाराष्ट्रात कोरोना मृत्यूंमध्ये लस न घेतलेलेच जास्त

पंजाब मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांकडे ईडीचे छापे

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या वेळी त्यांनी सर्व तरुण मित्रांचे अभिनंदन केले आहे. ‘लसीकरणासाठीचा तुमचा उत्साह देशभरातील नागरिकांना प्रेरणा देत आहे’ असे मनसुख मांडविया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत या बद्दल समाधान व्यक्त केले आहे. “ही प्रोत्साहन देणारी बातमी आहे. ही गती अशीच सुरु ठेवली पाहिजे. युवा भारत मार्ग दाखवत आहे” असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version