व्हिएतनामच्या नौदलाला मिळाली भारताची ‘कृपाण’ शक्ती

कृपाण युद्धनौका सन १९९१पासून भारताच्या नौदलाचा एक अविभाज्य भाग

व्हिएतनामच्या नौदलाला मिळाली भारताची ‘कृपाण’ शक्ती

व्हिएतनामच्या नौदलाला भारताने आगळीवेगळी भेट दिली आहे. भारतीय नौदलात राष्ट्रासाठी ३२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘कृपाण’ युद्धनौका शनिवारी संपूर्ण शस्त्रानिशी व्हिएतनाम पीपुल्स नौदलाला (व्हीपीएन)ला सुपूर्द केली गेली. भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर. हरिकुमार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

स्वदेशी बनावटीची कृपाण युद्धनौका सन १९९१पासून भारताच्या नौदलाचा एक अविभाज्य भाग आहे. गेल्या ३२ वर्षांत विविध मोहिमांमध्ये या युद्धनौकेचा सहभाग राहिला आहे. हे जहाज ९० मीटर लांब, १०.४५ मीटर रुंद असून तिचे वजन १४५० टन आहे. या जहाजाला संपूर्ण शस्त्रांनिशी व्हिएतनामच्या नौदलाला सुपूर्द करण्यात आले.

ही नौका मध्यम आणि जवळचे लक्ष्य गाठणारी बंदुके, लाँचर आणि जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्य भेदणाऱ्या क्षेपणास्त्रांसह सज्ज आहे. ही नौका जमिनीवरील युद्ध, समुद्रकिनारा आणि किनारपट्टीवरील गस्त, किनारपट्टीवरील सुरक्षा, समुद्री चाच्यांची आक्रमणे रोखणे आदी विविध मोहिमांसाठी सक्षम आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा:

कुस्ती चाचण्यांमधून सवलत प्रकरणात उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप नाही, पंघल राखीव

मुंबईत तस्करी करून आणलेली ३० कोटींची घड्याळे जप्त

सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणजे नवीन पटनायक !

इर्शाळवाडीतील दरडग्रस्त अनाथ मुलांना डॉ. गोऱ्हे यांनी दिला दिलासा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १९ जून रोजी भारताच्या दौऱ्यावर आलेल्या व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान वान गँग यांच्याशी चर्चा केल्यानंतर ‘कृपाण’ भेट देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २८जून रोजी नौदलाच्या विशाखापट्टणम येथील तळावरून आयएनस कृपाण व्हिएतनामसाठी रवाना झाले होते. ते ८ जुलै रोजी व्हिएतनाम येथील कॅम रान्ह येथे पोहोचले. येथेच झालेल्या सोहळ्यात कृपाण युद्धनौका व्हिएतनामला सुपूर्द करण्यात आली.

Exit mobile version