टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आणखी एक पदक खिशात घातलं आहे. भारताचा पैलवान रवी कुमार दहियाने ५७ किलो वजनी गटात रौप्यपदकावार नाव कोरलं आहे. रवीचा थोडक्यात पराभव झाला असून दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या जावूर युगुयेवने सुवर्णपदक मारलं आहे. पण रवीच्या या पदकासोबतच भारताची यंदाच्या ऑलिम्पिकमधील पदक संख्या ५ झाली आहे.
कुस्तीने भारताला कायमच ऑलिम्पिकमध्ये साथ दिली आहे. १९५२ साली हेलसिंकीमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पाहिलं मेडल मिळवून देणारे खाशाबा जाधव हे सुद्धा कुस्तिगीरच होते. गेल्या ४ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये (२००८, २०१२, २०१६, २०२०) भारताला सातत्याने कुस्तीत मेडल्स मिळत आहेत. २००८ साली सुशील कुमारने मिळवलेले कांस्य पदक, २०१२ मध्ये सुशील कुमारने मिळवलेले रौप्य पदक आणि योगेश्वर दत्तने मिळवलेले कांस्य पदक, तसेच २०१६ साली साक्षी मलिकने मिळवलेले कांस्य पदक हा गेल्या ३ ऑलिम्पिकचा इतिहास राहिला आहे. यामध्ये आता रवी दहियाने मिळवलेल्या रौप्य पदकाचीही भर पडणार आहे.
भारताचा पैलवान रवी कुमार दहिया अगदी स्वप्नवत कामगिरी करत ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. रवीने सेमीफायनलमध्ये कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामला मात देत अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं होतं. त्याची यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी पाहता तो भारताचा सुवर्णपदक नक्कीच मिळवून देईल असे वाटत होते. त्याने अंतिम सामन्यात खेळही तसाच केला. अगदी चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेर वेळेची मर्यादा असल्चाने रवी ३ गुणांनी कमी पडला आणि ७-४ ने त्याच्या हातातून सुवर्णपदक निसटलं.
हे ही वाचा:
महापूराच्या नावाखाली शिवसेनेची नवी वसुली सुरु
…तर मुख्यमंत्री उद्या कदाचित गेट वे ऑफ इंडियाचंसुद्धा लोकार्पण करतील
पोलिस कुटुंबियांना पाठवलेल्या नोटीसा रद्द करा
यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी चांगली ठरत आहे. भारताने आतापर्यंत 5 पदकं मिळवली असून आणखी काही भारताचे महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. पाच पैकी दोन रौप्य तर तीन कांस्य पदकं आहेत. यात सर्वांत आधी वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानूने रौैप्यपदक, त्यानंतर पीव्ही सिंधूने टेनिसमध्ये कांस्यपदक मिळवून दिलं. ज्यानंतर बुधवारी लवलिनाने बॉक्सिंगमध्ये कांस्य तर आज सकाळी हॉकी पुरुष संघाने कांस्य पदक मिळवून देत भारतासाठी पदकांचा चौकार मारला. ज्यानंतर आता रवी दहियाने रौप्य पदक जिंकत पदकांची संख्या पाच केली.