‘भारत-फ्रान्सचे लष्कर दाखवणार क्षमता, मेघालयात ‘शक्ती’ सराव सुरू’

दोन्ही देशाच्या सरावाची सातवी आवृत्ती

‘भारत-फ्रान्सचे लष्कर दाखवणार क्षमता, मेघालयात ‘शक्ती’ सराव सुरू’

भारत आणि फ्रान्स यांच्यातील सराव शक्तीच्या सातव्या आवृत्तीला सोमवारी(१३ मे) मेघालयमध्ये सुरुवात झाली.या सरावाचा उद्देश विविध क्षेत्रात ऑपरेशनसाठी दोन्ही बाजूंची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे आहे.संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

दोन्ही मित्र देशांमधील संरक्षण सहकार्य आणि त्यांच्या द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी या संयुक्त लष्करी सरावाचा उद्देश असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, १३ ते २६ मे या कालावधीत होणाऱ्या शक्ती सरावामुळे दोन्ही बाजूंना रणनीती, तंत्रे आणि संयुक्त ऑपरेशन्सच्या प्रक्रियेतील सर्वोत्तम सराव सामायिक करता येतील.या संयुक्त सरावामुळे दोन्ही देशांच्या सशस्त्र दलातील जवानांमध्ये सामंजस्य वाढण्यास मदत होईल. या सरावामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याची पातळी तर वाढेलच पण द्विपक्षीय संबंधांनाही चालना मिळेल, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.

हे ही वाचा:

‘तर ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपींना अटक करू शकत नाही’

सीएए बद्दल खोटी माहिती पसरवून देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न

केजरीवाल यांच्या गळ्याभोवती नवा फास आवळू लागला!

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला, २ दहशतवादी ठार!

अभ्यास ‘शक्ती’ हा भारत आणि फ्रान्समध्ये वैकल्पिकरित्या आयोजित केला जाणारा द्विवार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. त्याची मागील आवृत्ती नोव्हेंबर २०२१ मध्ये फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली होती.दोन्ही देशातील होणार सरावाची ही सातवी आवृत्ती असून भारतातील मेघालय येथील उमरोई येथे सराव सुरु आहे.संयुक्त सरावाच्या उद्घाटन समारंभाला फ्रान्सचे भारतातील राजदूत महामहिम थियरी मॅथ्यू आणि ५१ सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल प्रसन्ना सुधाकर जोशी उपस्थित होते.

Exit mobile version