इस्रायल-इराण संघर्षाबद्दल भारताने व्यक्त केली तीव्र चिंता!

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केला संपर्क

इस्रायल-इराण संघर्षाबद्दल भारताने व्यक्त केली तीव्र चिंता!

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल काट्ज आणि इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाल्ह्यान यांच्याशी टेलिफोनवर चर्चा केली. १ एप्रिल रोजी इस्रायलने दमास्कस येथील इराणच्या दूतावासावर क्षेपणास्त्रे डागल्याने इराणच्या दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह लष्कराचे सात सैनिक मारले गेले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने शनिवारी रात्री इस्रायलवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली.

जयशंकर यांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर ‘एक्स’वर याबाबत माहिती दिली. ‘इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल काट्झ यांच्याशी आताच चर्चा झाली. कालच्या घटनेबद्दल मी चिंता व्यक्त केली. व्यापक क्षेत्रीय परिस्थितीवर चर्चा केली. तसेच, एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सहमती व्यक्त केली,’ असे जयशंकर यांनी सांगितले.

भारताने या घटनेबद्दल चिंता व्यक्त करून तत्काळ तणाव कमी करण्याची विनंती केली. या भागांतील दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत. ‘आम्ही इस्रायल आणि इराणदरम्यान वाढत्या शत्रुत्वाबद्दल चिंतेत आहोत. यामुळे या भागातील शांती आणि सुरक्षेला धोका आहे. आम्ही हा तणाव तत्काळ कमी करण्याचे, संयम राखण्याचे, हिंसेपासून दूर राहण्याचे आणि कूटनितीच्या मार्गावर परतण्याचे आवाहन करत आहोत,’ असे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले होते.

हे ही वाचा:

सरबजीत यांचा मारेकरी मारला गेला, मात्र न्याय मिळाला नसल्याची मुलीची खंत

रामनवमीसाठी अयोध्येतील राम मंदिरात प्रसादासाठी १ लाख ११ हजार १११ किलोचे लाडू

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!

इंडी आघाडीचा जाहीरनामा देशाला दिवाळखोर बनवणारा

इराणच्या सैन्याने होर्मुज सामुद्रधुनीजवळ इस्रायलशी संबंधित एक मालवाहू जहाजाला ताब्यात घेतले आहे. त्यातील कर्मचाऱ्यांमध्ये १७ भारतीयांचा समावेश आहे. त्यांची सुटका व्हावी, यासाठी भारत सातत्याने इराणच्या संपर्कात आहे. जयशंकर यांनी रविवारी इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाह्यान यांच्याशी चर्चा करून या भारतीयांच्या सुटकेची मागणी केली. तसेच, सद्य परिस्थितीवर चर्चा केली.

भारत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘सध्या आम्ही भारतीयांना इराण अथवा इस्रायलमध्ये प्रवास करू नका, असे आवाहन केले आहे. तसेच, तेथे आधीपासूनच असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. पुढे काय होत आहे, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आम्हाला काही पावले उचलायला लागली किंवा काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करायला लागली, तर आम्ही त्यासाठी तयार आहोत,’ असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version