पाकिस्तानच्या लष्करी बजेटपेक्षा, भारताची स्मार्टफोनची निर्यात जास्त

भारत लवकरच चीनला टाकणार मागे

पाकिस्तानच्या लष्करी बजेटपेक्षा, भारताची स्मार्टफोनची निर्यात जास्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाकांक्षी उपक्रम अशी ओळख असलेले ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या दोन्ही उपक्रमांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सुरक्षा क्षेत्रातील अनेक शस्त्र भारत स्वतः बनवत असून इतर देशांनाही त्याची निर्यात करत आहे. याशिवाय स्मार्टफोन निर्मिती आणि ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोनच्या बाबतीतही भारत नवनवीन विक्रम करत आहे. यामुळे भारताचे शेजारी देश पाकिस्तानी आणि चीनची चिंता वाढली आहे. ‘नव भारत टाईम्स’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट असताना दुसरीकडे भारताने विक्रमी संख्येने ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन्सची निर्यात करून चीनला मागे टाकण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या चीन हा जगातील सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश आहे, पण आता चीननंतर भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत चीनमध्ये मोबाईल उत्पादनात घट होऊन भारत त्याला सहज मागे टाकून पुढे निघून जाईल.

अहवालात गंमतीशीर आकडेवारी समोर आली आहे. अहवालानुसार, भारताने २०२३ या आर्थिक वर्षात ११ अब्ज डॉलर्स किंमतीचे मोबाईल फोन्स निर्यात केले आहेत, जे पाकिस्तानच्या लष्करी बजेटपेक्षा जास्त आहे. २०२३ सालासाठी पाकिस्तानचे लष्करी बजेट ८ अब्ज डॉलर आहे. एवढेच नाही तर भारतात दरवर्षी सुमारे ४४ अब्ज डॉलर्स किंमतीचे स्मार्टफोन देशांतर्गत तयार केले जातात, जे पाकिस्तानच्या संरक्षण खर्चापेक्षा जास्त आहे.

हे ही वाचा:

“पाकिस्तानला बांगड्या घालायला लावतो”

‘तुम्ही ‘आप’ला मत दिल्यास मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही’

‘पेज थ्री संस्कृतीवर महाराष्ट्र चालवता येत नाही’

प्रशासनाच्या आदेशानंतरही गुजरातमधील जामनगरच्या रणजितसागर धरणावरील बेकायदा दर्गा ‘जैसे थे’

दुसरीकडे भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा आयफोन उत्पादन केंद्र बनला आहे. २०२६ पर्यंत भारतात आयफोनचे उत्पादन २६ टक्क्यांपर्यंत वाढू शकते, जे सध्या १४ ते १५ टक्के आहे. ऍपलचे भारतातील एकूण उत्पादन सुमारे १४ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचले आहे.

Exit mobile version