पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१७ नोव्हेंबर) फार्मा क्षेत्रातील पहिल्या जागतिक शिखर संमेलनाचे उद्घाटन केले. या संमेलनात मोदींनी भारताने १०० देशांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस निर्यात केले असल्याचे म्हटले. भाषणात मोदींनी भारताने गेल्या वर्षात भारताने फार्मा क्षेत्रात केलेल्या प्रगतीच्या कामगिरीचा दाखला देत आपण जगासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे म्हटले आहे.
‘गेल्या वर्षभरात आपण जवळपास १०० देशांना कोरोना प्रतिबंधक लसीचे ६.५ कोटीहून अधिक डोस निर्यात केले आहेत. तसेच येत्या काळात आपली उत्पादन क्षमता जशी वाढेल तसे आपण अजून मोठे लक्ष्य गाठू शकणार आहोत,’ असे नरेंद्र मोदी म्हणाले.
LIVE: PM Shri @narendramodi inaugurates 1st Global Innovation Summit of Pharmaceutical sector. https://t.co/Xteg6KtxZr
— BJP (@BJP4India) November 18, 2021
कोरोनाच्या या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक घटकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय आरोग्य क्षेत्रावरील जगाने दाखवलेल्या विश्वासामुळे आज फार्मा क्षेत्रात भारताचे नाव आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्येही वैद्यकीय क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा आणि मोठा असल्याचेही मोदी यांनी म्हटले. वैद्यकीय क्षेत्रातील घटकांच्या परवडणाऱ्या किंमती आणि चांगल्या गुणवत्तेमुळे भारतीय वैद्यकीय क्षेत्राकडे जगाचे लक्ष आहे.
हे ही वाचा:
‘पवारांच्या धमक्यांना भीक घालत नाही’
पवारसाहेब पावसात भिजले; पण पावसात भिजणाऱ्या कामगारांच्या अश्रुंचे काय?
सामाजिक कार्यकर्ते वसंत सुर्वे यांचे निधन
शिवसेना जिल्हाप्रमुखाचा ‘गुटखा’ जप्त?
लसीचे डोस निर्यात केले असून येत्या काळात उत्पादन क्षमता वाढल्यावर अजून निर्यात केली जाईल. मानव जातीच्या भल्यासाठी काम करणे हे आपले लक्ष्य आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारताने कोरोना महामारी दरम्यान लसीकरणात अनेक टप्प्यांना गवसणी घातली आहे.