कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी !

भारताने दिले प्रत्युत्तर

कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जूनमध्ये झालेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारचा संभाव्य संबंध असल्याचा दावा केल्यानंतर कॅनडाने सोमवारी एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली.त्यानंतर काही तासांतच भारताने मंगळवारी कॅनडाच्या सर्वोच्च मुत्सद्दी ऑलिव्हियर सिल्वेस्टरची हकालपट्टी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) कॅनडाचे उच्चायुक्त, कॅमेरॉन मॅके यांना बोलावले त्यांना सांगण्यात आलं की, भारतानं नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ कॅनेडियन राजदुताला देश सोडण्यास सांगण्याचा निर्णय घेतला आहे. राजदुताला पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पुढे म्हटलं आहे की, “हा निर्णय कॅनडाच्या राजदुताचा आमच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग यावर भारत सरकारची वाढती चिंता प्रतिबिंबित करतो.

भारताने कॅनडाच्या मुत्सद्द्याला ५ दिवसांच्या आत सोडण्यास सांगितले -प्रमुख मुद्दे
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना शीख नेते हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं वक्तव्य केलं

ट्रुडो यांच्या आरोपानंतर कॅनडाने एका सर्वोच्च भारतीय राजनयिकाची हकालपट्टी केली. कॅनडातील भारतीय गुप्तचर विभागाचे प्रमुख पवन कुमार राय यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी केली.

हे ही वाचा:

खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येसंदर्भात कॅनडाने केलेल्या वक्तव्याचा भारताने केला धिक्कार

जुन्या संसद भवनाला ‘संविधान सदन’ असे नामकरण करण्याची सूचना

तामिळ संगीतकार, अभिनेता विजय अँटनी यांच्या मुलीने केली आत्महत्या !

खर्गेचे G2 आणि गोयल म्हणाले 2G, One G, son G !

काही तासांतच, भारताने झटपट निर्णय घेत कॅनडाच्या वरिष्ठ मुत्सद्दी ऑलिव्हियर सिल्वेस्टरची हकालपट्टी केली. कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांना आज परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी बोलावून भारतातील एका मुत्सद्याची हकालपट्टी करण्याच्या निर्णयाची माहिती दिली.

कॅनडाने केलेल्या आरोपाला भारत सरकारने फेटाळून लावले आणि कॅनडानं केलेला हत्येचा आरोप अत्यंत हास्यास्पद आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं भारतानं म्हटलं आहे.परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कॅनडातील कोणत्याही हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप मूर्खपणाचा आणि प्रेरित आहे.”

परदेशी मीडियानुसार, ट्रूडो यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह कॅनडाच्या काही जवळच्या मित्र राष्ट्रांच्या नेत्यांना भारतासोबतच्या नवीन राजनैतिक घडामोडींची माहिती दिली आहे.

भारत आणि कॅनडामधील नवीन घडामोडींना उत्तर देताना, युनायटेड स्टेट्सने सांगितले की, ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांबद्दल आम्ही चिंतीत आहोत.व्हाईट हाऊसच्या एका निवेदनात असेही म्हटले आहे की, “कॅनडाचा तपास पुढे जाणे आणि गुन्हेगारांना न्याय मिळवून देणे महत्वाचे असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

परिस्थिती पाहून नवी दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांचा मोठा ताफा कार्यालयाजवळ तैनात करण्यात आला आहे.

हरदीप सिंग निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सचा (KTF) प्रमुख होता.निज्जर हा जालंधरच्या भारसिंह पुरा गावचे रहिवाशी होता. १९९६ मध्ये तो कॅनडाला गेला , त्यानंतर त्याने कॅनडामध्ये प्लंबर म्हणून काम सुरू केलं आणि कॅनडाचा नागरिक झाला.कालांतरानं तो खलिस्तानी कारवायांमध्ये सामील झाला.पंजाबमधील लुधियाना येथे २००७ मध्ये झालेल्या स्फोटात सहा ठार आणि ४२ जखमी होण्यासह अनेक प्रकरणांमध्ये निज्जरचा हात होता.भारतीयांनी त्याच्या प्रत्यार्पणाची अनेकदा मागणी केली होती. २०२० मध्ये भारताने निज्जरला दहशतवादी म्हणून घोषित केले होते.कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील गुरुद्वाराबाहेर १८ जून रोजी हरदीपसिंग निज्जर यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

 

Exit mobile version