टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात बुधवारी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघातून बाहेर असणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियात इंग्लंडसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑलराउंडर शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. कर्णधार विराट कोहलीनं शार्दुल ठाकूरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश होण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या विरोधात ब्रिस्बेन कसोटीत शार्दुल ठाकूरनं धमाकेदार खेळी करत आपलं योगदान दिलं होतं. शार्दुल ठाकूरनं सात विकेट्स घेतले होते. तसेच ६७ धावांच्या जोरावर टीम इंडियाला ऐतिहासिक विजयाला गवसणी घालण्यात महत्त्वाचं योगदान दिलं होतं. तसेच, टीम इंडियाला ऑलराउंडर हार्दिक पांड्याची कमतरता भासत आहे. दुखापतीमुळं कसोटी सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी हार्दिक पांड्या फिट नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी शार्दुलचा संघात समावेश होऊ शकतो.
हे ही वाचा:
‘रॉ’ एजंटच्या भूमिकेत दिसणार ‘खिलाडी’ कुमार! बघा ‘बेलबॉटम’ चा धमाकेदार ट्रेलर
ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला राज्यपालांची टाचणी
…म्हणून काँग्रेस नेत्याला केले समर्थकांनीच ट्रोल
भारतातील कम्युनिस्ट पक्षांआडून चीन खेळत होता डावपेच
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारी ४ ऑगस्ट रोजी नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानात खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असून ३ वाजता नाणेफेक करण्याक येईल. हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.