भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना आजपासून

भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना आजपासून

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून पहिला सामना अनिर्णीत सुटला. पावसाच्या व्यत्ययामुळे भारताच्या हाता-तोंडाशी आलेला सामना भारत जिंकू शकला नाही. शेवटच्या दिवशी अवघ्या १५७ धावांची गरज असताना भारताला फलंदाजी करायलाच मिळाली नसल्याने सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला. दोन्ही संघाना समान गुण देण्यात आले असल्याने दोन्ही संघ सध्या बरोबरीत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

दोन्ही संघामध्ये दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे काही बदल होऊ शकतात. भारतीय संघात पहिला बदल म्हणजे अष्टपैलू शार्दुल ठाकुरच्या जागी आर आश्विनला खेळवले जाऊ शकते. तर दुसरा बदल म्हणून मोहम्मद सिराजच्या जागी अनुभवी इशांत शर्माला खेळवले जाऊ शकते. शार्दुल ठाकुरच्या पायाला हॅमस्ट्रिंग इंजरी झाल्यामुळे त्याची ही दुखापत कधीपर्यंत ठिक होईल हे अद्याप माहित नसल्याने दुसऱ्या कसोटीत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी अष्टपैलू पर्याय म्हणून आर आश्विनला संधी देण्यात येईल. तसेच इशांत शर्मा याचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड चांगला असल्याने त्याला अंतिम ११ मध्ये स्थान देण्यासाठी मोहम्मद सिराजला बाहेर ठेवले जाईल. तर इंग्लंड संघा आघाडीचे गोलंदाज स्टवर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांनाही विश्राती दिली जाऊ शकते.

हे ही वाचा:

अश्विनी उपाध्याय यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत

भारतात येणार चार नव्या हवाई कंपन्या?

उपग्रह प्रक्षेपणात इस्रोला आले अपयश

चालुक्य कालीन मंदिरात झाली चोरी!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध अशा लॉर्ड्स मैदानात खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असून ३ वाजता नाणेफेक करण्यात येईल. हा दुसरा कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

Exit mobile version