लीड्स कसोटीत भारत सावरतोय

लीड्स कसोटीत भारत सावरतोय

लीड्स कसोटीचा तिसरा दिवस हा भारताच्या नावे राहिले आहे सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने या कसोटीतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने धावफलकावर २१५ धावा चढवल्या असून भारताचे दोन गडी बाद झाले आहेत.

लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे सुरुवातीच्या काही मिनिटांतच भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड संघाचे उर्वरित दोन फलंदाज बाद केले. त्यामुळे भारतीय संघ आपली दुसऱ्या डावातील फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. सलामीवीर रोहित शर्मा आणि के.एल. राहुल हे दोघेही सुरुवातीपासूनच संयमाने फलंदाजी करताना दिसले. पण संघाच्या ३४ धावा झालेल्या असतानाच ओव्हर्टनच्या चेंडूवर राहुल झेलबाद झाला.

हे ही वाचा:

भारताचे विक्रमी लसीकरण! एका दिवसात एक करोड

अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे

…म्हणून सध्या चवदार तळे आहे चर्चेत

‘कोळी समाजाला हद्दपार करण्याचे शिवसेनेचे कारस्थान’

त्यानंतर चेतेश्वर पुजारा हा खेळण्यासाठी मैदानात उतरला. रोहित शर्मा आणि पुजारा यांच्यात ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. यात रोहित शर्माने आपले अर्थ शतकही पूर्ण केले. पण चहापानानंतर संघ जेव्हा पुन्हा मैदानात उतरला तेव्हा रोबिन्सनच्या चेंडूवर रोहित पायचीत झाला. त्याने १५६ चेंडूंमध्ये ५९ धावा केल्या.

त्यानंतर कर्णधार विराट कोहली हा मैदानावर उतरला. पुजारा आणि कोहली हे दोघे भारताकडून मैदानावर टिकून आहेत. पुजारा ९१ धावांवर नाबाद असून शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तर विराट कोहली अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. तो ४५ धावांवर खेळत आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत ९९ धावांची भागीदारी झाली आहे

Exit mobile version