भारताने रशियाकडून तेल खरेदी करून जगावर उपकार केले नाहीतर…

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे वक्तव्य

भारताने रशियाकडून तेल खरेदी करून जगावर उपकार केले नाहीतर…

भारताने रशियाकडून तेल विकत घेतले नसते तर त्याची किंमत झपाट्याने वाढली असती, असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. असे करून भारताने जगावर उपकार केल्याचेही त्यांनी म्हटले. भारताला जो चांगला दर देईल त्याच्याकडून तेल खरेदी केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रशियन तेलावर कोणतेही निर्बंध नसल्याचे केंद्रीय मंत्री पुरी यांनी म्हटले. ते म्हणाले, रशियन तेल खरेदी करून भारताने जगावर उपकार केले आहेत, कारण आम्ही जर तसे केले नसते तर जागतिक किंमत प्रती बॅरल २०० डॉलरने वाढली असती. रशियन तेलावर कधीही बंदी नव्हती, फक्त किंमत मर्यादा होती. भारतीय कंपन्यांनी याचे पालन केले.

अपूर्ण माहिती असलेल्या काही लोकांनी भारतावर निर्बंध घालण्याबद्दल बोलत होते. इतर अनेक युरोपियन आणि आशियाई राष्ट्रांनी रशयाकडून अब्जावधी डॉलर्सचे कच्चे तेल, डिझेल, एलएनजी, दुर्मिळ खनिजे खरेदी केली. आमच्या तेल कंपन्यांना जो सर्तोत्तम दर देईल त्यांच्याकडून आम्ही तेल खरेदी करत खरू, असे मंत्री पुरी म्हणाले.  तसेच तेलाच्या किमती कमी होतील, अशी आशा असल्याचे मंत्री पुरी यांनी सांगितले. २०२६ पर्यंत, जेव्हा बाजारात अधिक ऊर्जा उपलब्ध होईल, तेव्हा किमती स्थिर राहण्याची किंवा खाली येण्याची शक्यात जास्त असल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

मी कोणतीही मुलाखत दिलेली नाही! भुजबळांनी राजदीपच्या पुस्तकातील दावे फेटाळले

जम्मू- काश्मीरमधील सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीर अधिवेशन: पाचव्या दिवशीही कलम ३७० च्या मुद्द्यावरून गदारोळ

राहुल गांधी यांनी अफू घेऊन लिखाण केलेय का?

Exit mobile version