एकाच वेळी ७८ हजार २०० तिरंगा फडकवून भारताने विश्वविक्रम केला आहे. भारताच्या या अनोख्या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली असून गिनीज बुक मध्ये भारताच्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.
शनिवार, २३ एप्रिल रोजी बिहार मध्ये हा विश्वविक्रम रचण्यात आला. स्वातंत्र्य संग्रामातील महान क्रांतिकारी बाबु वीर कुंवर सिंह यांच्या विजय उत्सवानिमित्त बिहारमधील भोजपुर जिल्ह्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भोजपुर जिल्ह्यातील जगदिशपुर येथे हा कार्यक्रम पार पडला असून यावेळी ७८ हजार २०० राष्ट्र ध्वज फडकवण्यात आले. या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.
हे ही वाचा:
संजय राऊत यांच्या विरोधात नागपूरमध्ये तक्रार
किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास शूट ऍट साईट!
हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा
नवनीत राणांच्या आरोपांना उत्तर द्यायला सरसावले मुंबई पोलिस आयुक्त
या आधी एकाच वेळी सर्वाधिक राष्ट्रध्वज फडकवण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पण आता हा विश्वविक्रम भारताच्या नावे नोंदविण्यात आला आहे. २३ एप्रिल रोजी पाच मिनिटांसाठी एकाच वेळी ७८ हजार २०० राष्ट्रध्वज फडकवत भारताने हा किताब आपल्या नावे केला आहे.
या विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले.