लसीकरणात भारताची ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे

लसीकरणात भारताची ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी भारताने त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. काल म्हणजे शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी भारतात विक्रमी लसीकरण झाले आहे. एका दिवसात अडीच कोटी पेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक लसी देण्याचा विक्रम भारताने केला आहे. जगात एका दिवसात देण्यात आलेल्या या सर्वाधिक कोविड प्रतिबंधक लसी आहेत.

भारतात गेले काही महिने जगातील सर्वत मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. कोविड महामारी आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे नेतृत्व करताना खंबीरपणे या महामारीचा सामना करत आहेत. त्यांनी जगासमोर एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना जन्मदिनी म्हणजेच शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी लसीकरणाच्या माध्यमातून खास भेट देण्यात यावी असा विचार अनेक पातळीवर करण्यात आला.

हे ही वाचा:

…म्हणून अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

विद्यापीठ अधिकारी घेऊ शकणार फक्त १२ लाखांपर्यंतच गाडी!

तिला व्हायचे आहे बॅडमिंटनपटू; पण पोट भरण्यासाठी चिरावी लागतेय भाजी

सेंट्रल व्हिस्टावरून मोदींनी धरले विरोधकांना धारेवर

यामध्ये अनेक राज्य सरकारे, महानगरपालिका, भारतीय जनता पार्टी इतर सामाजिक संस्था यांनी सहभाग नोंदवला. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे भारताने एकाच दिवशी अडीच कोटी पेक्षा जास्त लसीकरण करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. हा आकडा म्हणजे अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे

भारताच्या या कामगिरीबद्दल आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत समाधान व्यक्त केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी भारताने इतिहास रचला आहे. २.५ कोटींपेक्षा अधिक लसी देऊन भारताच्या आणि जगाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. आजचा दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावे आहे.”

Exit mobile version